श्री दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण : मान्यवरांची उपस्थितीप्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ / प्रतिनिधी :

येथील श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शिरोळ नगरपरिषद व माजी आमदार स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन यांच्यावतीने येथील संगमनगर समाज मंदिर परिसरात 75 वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली, दरम्यान, दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,  दत्त कारखाना संचालक अनिलराव यादव, दरगु गावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  


  यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, दत्त कारखाना उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सहकार व कृषी क्षेत्रात आदर्शवत काम केले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण पूरकवृक्षारोपण उपक्रम साजरा होत असल्याचे सांगून त्यांनी शिरोळ शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून एक लाख रोपांची वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.

       यावेळी माजी सरपंच गजानन संकपाळ, गोरखनाथ माने, माजी उपसरपंच  बाबा पाटील, नगरसेवक तातोबा पाटील, योगेश पुजारी, राजाराम कोळी, राजेंद्र माने, डॉ. अरविंद माने ,विठ्ठल पाटील, एन. वाय. जाधव, उद्योगपती अभिजीत माने, पत्रकार डी. आर. पाटील, बाळासाहेब माळी, दगडू माने, चंद्रकांत भाट, माजी ग्रा. पं. सदस्य धनाजी पाटील- नरदेकर, पिंटू फल्ले, भगवान आवळे, विजय आरगे, विजयसिंह माने -देशमुख, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर, जनार्दन कांबळे, अमरसिंह शिंदे, आण्णासो पुजारी, सुभाष आवळे, अनिल महाजन, निलेश गावडे, पोपट बिराणे, संजय भोरे, विनोद बिराणे, चंद्रकांत भोरे, निवास आवळे, बबन सदामते, अवधूत भोरे, आशिष साठे, संदीप चूडमुंगे यांच्यासह डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते , नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दत्त कारखाना संचालक दरगु गावडे यांनी स्वागत केले. शक्तीजीत उर्फ चिकू गुरव यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post