गेल्या सव्वा महिन्यापासून लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर पार पडतोय.

  चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार असून त्यांच्याकडे पुन्हा एकदा महसूल खाते सोपवली जाण्याची दाट शक्यता 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई - गेल्या सव्वा महिन्यापासून लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर पार पडतोय. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार असून त्यांच्याकडे पुन्हा एकदा महसूल खाते सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रथेनुसार एक व्यक्ती एक पद असा दंडक असल्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद त्यांना सोडावे लागणार आहे.

 भारतीय जनता पक्षातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष हे पद आता मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना यांना सध्या तरी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याने त्यांच्याकडे या पदाचा भाग सोपवला जाण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री आणि माझी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला नोकरी यश प्राप्त करून दिले होते. मुंबई तसंच राज्यात अशी शेलार यांचा मोठा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे आशिष शेलार यांनी अन्य राज्यांच्या निवडणुकीत प्रचारक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आशिष शेलार यांचे वरिष्ठ पातळीवर असलेले संबंध पक्षातील त्यांचे स्थान आणि मुंबई महानगरपालिकाच्या आगामी निवडणुका पाहता आशिष शेलार यांची पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post