अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : -अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ‘घरोघरी तिरंगा’उपक्रमांतर्गत मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने आदी उपस्थित होते. औद्योगिक संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ५७ हजार ३१७ तिरंगा ध्वज मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी हवेली तालुक्यात २११, बारामती ८ हजार ४९, आंबेगाव ५ हजार १४१, भोर १ हजार ८८८, दौंड ७ हजार ४४८, इंदापूर ४ हजार ५६७, जुन्नर ६ हजार ८४२, खेड ३ हजार १२१, मावळ १ हजार ६४४, मुळशी ४८३, पुरंदर ५ हजार २४३, शिरूर ४ हजार १४३, वेल्हे ५२४ आणि पुणे शहरासाठी ८ हजार १३ ध्वज देण्यात आले आहेत.

जिल्हा पुरवठा विभागातर्फे हे ध्वज जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत नागरिकांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनी सदर ध्वज प्राप्त करून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post