एक मत:- स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने....

 वाचकांची प्रतिक्रिया :


पुणे : आपण सर्व भारतीय सध्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या   कार्यक्रमांचे  आयोजन केले जात आहे. या मध्ये शाळा, कॉलेज, कार्यालये किंवा नागरिक वेगवेगळ्या रॅलीचे आयोजन करत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. वास्तविक हा आपल्या देशाचा एक मोठा आनंदोत्सव आहे, यात शंका नाही. परंतु दुसऱ्या बाजूने विचार करता, सध्या भारतातील काही राज्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली  आहे, तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती व अतिवृष्टीचा इशारा राष्ट्रीय हवामान खात्याने दिला आहे. त्या अनुषंगाने काही जिल्ह्यांना व शहरांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. याचबरोबर कोविड १९( कोरोना) किंवा स्वाइन फ्लू सारख्या आजारांचा येथे उल्लेख करावासा वाटतो. सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर होऊ नये असे वाटते. कारण अतिवृष्टी, पुरसदृश्य परिस्थिती याकरिता स्थानिक प्रशासन व्यस्त आहे. सध्याची नैसर्गिक व आरोग्यदायी परिस्थिती पाहता सध्या  स्वातंत्र्याच्या  सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत ते तात्पुरत्या स्वरूपाचे रद्द करून पुढील सप्ताहात  किंवा पंधरवड्यात आयोजित करावेत असे वाटते. या अनुषंगाने नागरिक-  स्थानिक प्रशासन यांनी पुढाकार घ्यावा ही विनंती. 

डॉ. तुषार निकाळजे. ( पुणे )

 एक नागरिक.

Post a Comment

Previous Post Next Post