गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पूणे : शहराचा वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार. यापूर्वी शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्‍वभुमीवर सुरक्षेची उपाययोजना तसेच वाहतूक कोंडी यामुळे विविध रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. दि.एक सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपातील बदल दुपारी तीन ते गर्दी संपेपर्यंत हा बदल राहिल.

तात्पुरत्या स्वरूपातील वाहतूक बदल :

शिवाजीनगरवरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी – स. गो. बर्वे चौक-जे. एम. रोड-अलका चौक-टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक – बोल्हाई चौक मार्गे नेहरु रोडचा वापर करुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. गर्दीची परिस्थीती पाहून पीएमपीएमएल बसेस या वरीलप्रमाणे वळविण्यात येतील. चारचाकी वाहन चालकांनी शिवाजीनगरवरून स्वारगेटला जाण्यासाठी वरील मार्गाचा वापर करता येईल. चारचाकी वाहनांना गाडगीळ पुतळा ते शाहीर अमर चौक व पुढे नेहरू रोडने स्वारगेटकडे जाता येईल. तसेच जिजामाता चौक ते फुटका बुरज येथून उजवीकडे वळून शनिवारवाड्या पासून नदीपात्रातील रस्त्याने (चंद्रशेखर आपटेरोड) भिडेपूल जंक्‍शनवरुन अलका चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई…
लक्ष्मी रोडवरील चारचाकी वाहन चालकांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीरोडवरून हमजेखान चौकातून डावीकडून वळून महाराणाप्रताप रस्त्याने जावे. तसेच आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

संपूर्ण गणेशोत्सवात बंद असणारे रस्ते…

लक्ष्मी रोड – हमजेखान चौक ते टिळक चौक रस्ता
पर्यायी मार्ग : 1) डुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दुधभट्टीवरून सरळ दारूवाला पूल. खडीचे मैदान चौक डावीकडे वळून अपोलो टॉकीज पाठीमागील रस्त्यावरून सिंचन भवन. डावीकडे वळून शाहीर अमर शेख चौक, कुंभारवेस चौक, म.न.पा. भवन पाठीमागील रस्त्याने इच्छित स्थळी जावे. 2) हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने सरळ घोरपडी पेठ पोलीस चौकी पुढे शंकर शेठ रोडने इच्छित स्थळी जावे.

शिवाजी रोड – स. गो. बर्वे ते जेधे चौक रस्ता बंद

पर्यायी मार्ग : 1) शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो. बर्वे चौक- जे.एम.रोड-अलका चौक टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा 2) कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोड मार्गे घोरपडी पेठ पोलीस चौकी. 3) वाहतुकीचे परिस्थितीनुसार गाडगीळ पुतळ्यापर्यंत येणारी दुचाकी वाहने ही लालमहल पर्यंत सोडण्यात येतील.

बाजीराव रोड – पूरम चौक ते आप्पा बळवंत चौक

पर्यायी मार्ग : पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रोडने आप्पा बळवंत चौक.
टिळक रोड – मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक
पर्यायी मार्ग : जेधे चौक, नेहरू स्टेडीयम समोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पुरम चौक व हिराबाग.
सिंहगड गॅरेज, घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण ते हिराबाग चौक
पर्यायी मार्ग : सिंहगड गॅरेज चौकातून सरळ झगडेवाडी, वेगासेंटर (शंकरशेठ रोड) पासून वाहन चालकांनी इच्छित स्थळी जावे.
दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक, हिराबाग चौक
पर्यायी मार्ग : दिनकरराव जवळकर पथने सरळ बाजीराव रोड डावीकडे वळून टेलिफोन भवन त पूरम चौक, टिळक रोडने इच्छित स्थळी जावे.

कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रोड

पर्यायी मार्ग : लहान रस्ता असल्याने पर्यायी मार्ग दिलेला नाही.
सणस रोड – गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक रस्ता
पर्यायी मार्ग : गोटीराम भैय्या चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, डावीकडे वळून कस्तुरे चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करावा. पानघंटी चौक ते गंज पेठ चौकी रस्ता बंद
पर्यायी मार्ग : पानघंटी चौक, जैन मंदीर चौक, फुलवाला चौक, कस्तूरे चौक, उजवीकडे वळून गंज पेठ चौकी मार्गे इच्छित स्थळी जावे.

गंजपेठ चौकातून वीर लहुजी वस्ताद तालीमकडे जाण्यास बंदी
पर्यायी मार्ग : लहान रस्ता असल्याने पर्यायी मार्ग नाही.
गावकसाव मशिद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी रस्ता बंद
पर्यायी मार्ग : 1) गावकसाब मशिद, बाबाजन चौक, सरबतवाला चौक, सेंट्रल स्ट्रीट चौकी.2) गावकसाब मशिद, सेंट्रल स्ट्रीट, इंदिरा गांधी चौक, डावीकडे वळून भगवान महावीर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
कोहिनुर चौक ते बाबाजान चौक रस्ता बंद
पर्यायी मार्ग : सरबतवाला चौक, डावीकडे वळून पर्यायी रस्ता वापरावा.

येथे पार्किंग करा :

विमलाबाई गरवारे कॉलेज, कर्वेरोड , एच.व्ही.देसाई कॉलेज, म.न.पा. विद्यालय
पुलाची वाडी नदी किनारी , पुरम चौक ते हॉटेल विश्‍व रस्त्याचे डावे बाजूस
गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, दारूवाला पुल ते खडीचे मैदान गणेश रोड
कॉंग्रेस भवन म.न.पा. रोड, व्होल्गा चौक ते मित्र मंडळ चौक, कॅनॉलचे कडेस बाजी पासलकर पथ
सर्कस मैदान, टिळक पुल ते भिडे पुल नदी किनारी , बालभवनसमोर सारसबाग रोड बजाज पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू, हमालवाडा पार्कींग नारायणपेठ

येथे पार्किंग करू नका :

शिवाजीरोड -जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौक, मंडई ते शनिपार चौक, बाजीरावरोड-शनिपार ते फुटकाबुरुज पर्यंत, आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक पर्यंत.
शिवाजी रोडवर जिजामाता चौक ते बेलबाग चौक ते रामेश्‍वर चौक उजवीकडे वळून मंडई ते शनिपार चौक उजवीकडे सेवासदन चौक ते आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्कींगसाठी मनाई राहील. तसेच आवश्‍यकता भासल्यास या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशास मनाई राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post