'लहू बोलता भी है' सांस्कृतिक कार्यक्रमास जोरदार प्रतिसादप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तर्फे "लहू बोलता भी है" या शिर्षका खाली 'भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुस्लीम महामानवांचे योगदान' या विषयावर आधारीत वकृत्व,पथनाट्य समूह गीत सादरीकरणाचे आयोजन कोंढवा येथे करण्यात आले होते.

हा कार्यक्रम पुणे महानगरपालीकेच्या इमाम आबु हनिफा सांस्कृतिक सभागृह येथे रविवारी,२८ ऑगस्ट रोजी सकाळी 8-30 ते 5-00 वाजे पर्यन्त घेण्यात आला. या मध्ये पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटि,न्यू ग्रेस इंग्लीश मिडीयम स्कूल,म,न,पा शाळा, मौलाना अबुलकलाम आझाद स्कुल,व्हॅल्यू व्ह्यू  स्कुल, बैतूल उलेमा उर्दू मिडीयम स्कूल,इत्यादी शाळातील 470 विद्यार्थी सहभागी झाले. 

पाकिस्तान मध्ये शांती यात्रा काढून नुकतेच परतलेले  विश्वमित्र योगेश,एस.नितीन,जालंदरनाथ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेधा बाबर,हाजी फिरोज शेख,हुसेन शेख, अजिम गुडाकूवाला,इब्राहिम शेख,डॉ.सुर्यवंशी,सूरेख वाघमारे,हाजी इम्तियाज, अब्दुल बागवान,सादिक पानसरे उपस्थीत होते.सूत्र संचालन इब्राहिम खान यांनी केले.जहाआरा यांनी परीक्षण केले.इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी आभार मानले. 


Post a Comment

Previous Post Next Post