कोल्हापुर मध्ये धार्मिक कार्यक्रमात असा सारा धिंगाणा

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर – राज्यासह कोल्हापूर जिल्हा देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव तसेच श्रावणी सोमवार साजरा करत असताना कोल्हापूर शहरात एक लाजिरवाणी गोष्ट घडली आहे. शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्या कार्यक्रमात भर दिवसा डॉलबीच्या ठेक्यावर तृतीयपंथी नाचवत असलेला व्हिडीओ समोर आला आहे.


सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यामुळे सर्व स्तरावरून पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरवर्षी तिसर्‍या श्रावण सोमवारी शुक्रवार पेठेत देवीचे जग आणण्याची प्रथा आहे. काल दुपारी हा धार्मिक कार्यक्रम होता.या कार्यक्रमात डॉलबीच्या ठेक्यावर तृतीयपंथी नृत्य करत आहे. विशेष म्हणजे हातात सिगारेट घेवुन धूम्रपान करीत डॉलबीच्या कर्णकर्कश आवाजात हा सारा धिंगाणा सुरू होता. यामध्ये हजारो लोक सहभागी झाल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिना दिवशी कोल्हापुरात धार्मिक कार्यक्रमात असा सारा धिंगाणा सुरु असताना पोलीस प्रशासन काय करत होत ?, पोलिसांना याची कल्पना नव्हती का ?, की या कडे पोलिसांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलय. असा सवाल सर्वसामान्यामधून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post