मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका):  जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः 8 ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सकाळी 11 पासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत 5 फुट 7 इंचाने वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता(उत्तर) रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.

 जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूःस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post