ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनची तालुका ,शहर कार्यकारिणी जाहीर

 

तालुका अध्यक्षपदी प्रमोद खटावकर ; इचलकरंजी शहर अध्यक्षपदी संतोष दत्तवाडे यांची निवड 


प्रेस मीडिया लाईव्ह :

ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनच्या वतीने हातकणंगले तालुका व इचलकरंजी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये तालुका अध्यक्षपदी प्रमोद खटावकर तर इचलकरंजी शहर अध्यक्षपदी संतोष दत्तवाडे यांची निवड करण्यात आली.           

ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशन ही संघटना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन्स  ,भारत सरकार व अमेरिकन बार असोसिएशनशी संलग्न कार्य करणारी देशातील पहिली मानवाधिकार संघटना आहे.या संघटनेच्या माध्यमातून मानवी हक्कांचे उल्लंघन होवून अन्याय , अत्याचाराला बळी पडलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.या संघटनेची नुकतीच हातकणंगले तालुका व इचलकरंजी शहर कार्यकारिणी जाहीर होवून नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.यामध्ये तालुका अध्यक्षपदी प्रमोद खटावकर तर इचलकरंजी शहर अध्यक्षपदी संतोष दत्तवाडे यांची निवड करण्यात आली. तसेच सदर तालुका कार्यकारिणीमध्ये कृष्णात गोंदुकुप्पे, प्रसाद ठाणेकर, रमण आमने,संजय कांबळे, उमा ठिगळे, पंकज साळुंखे, प्रदीप कुंभार, गणेश लोळगे, सचिन चौगुले, प्रतीक साठे, योगेश शिरगुरे व इचलकरंजी शहर कार्यकारिणीमध्ये ॲड. पंकज पाटील, गणेश मिसाळ, महेश सूर्यवंशी,अमित चावरे, सौरभ मोळके, अक्षय चिंचणे, अक्षय जाधव. मंगलसिंग व्हडगे, शिवाजी मस्के, रोहीत जाधव यांची विविध पदांवर निवड करण्यात आली.सदर नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र सुपूर्द करताना इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांची उपस्थिती लाभली. सोशल मीडियाच्या धावत्या जगात प्रत्येक व्यक्तीला मानवाधिकार याबद्दल माहिती आणि जागरुकताहअसणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ते काम आता ऑल इंडिया हुमन राईट्स असोसिएशनच्या  माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवावे असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी या संघटनेच्या माध्यमातून अन्याय , अत्याचार पिडीतांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु ,अशी ग्वाही दिली.

यावेळी जिल्हा कार्यकारणीचे प्रमुख अमर ढेरे , लहू घाडगे,बाणदार बाबा, महेश गोंदकर ,संतोष खटावकर , शौकत माणगावे आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post