इचलकरंजी पोलीस दलामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी - पोलीस दलातील बहुतांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी पौर्णिमेला सुट्टी मिळत नसल्यामुळे आपल्या बहिणेकडे राखी बांधून घेण्यासाठी जायचे होत नाही.परिणामी आपल्या बहिणीच्या प्रेमापासून बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना वंचित रहावे लागते.


  अशा सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाचा आनंद घेता यावे व बहिणीचे निखळ व निस्वार्थी प्रेम लाभावे म्हणून इचलकरंजी महिला दक्षता कमिटीच्या वतीने गेली 10 ते 12 वर्ष झाले राखी पौर्णिमानिमित्त शहरातील सर्व पोलीस ठाण्यात व शहर वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पोलीस बांधवांच्या करीता रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला जातो.

  सालाबादप्रमाणे याही वर्षी सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दक्षता कमिटीच्या सर्व महिला भगिनींनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस बांधवांना राख्या बांधल्या.

  याप्रसंगी शिवाजीनगरचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत निरावडे,गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजू ताशीलदार,शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री अभिजित पाटील,शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री विकास अडसूळ, शिवाजीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र देशमुख,पोलीस उपनिरीक्षक श्री मिथुन सावंत,श्री नाथा गळवे,श्री मनोज पाटील,सहायक फौजदार श्री कराड,गावभागचे सहायक पोलीस निरीक्षक श्री गाढवे सर,उपनिरीक्षक श्री भागवत मुळीक,शहापूरच्या पोलीस उपनिरीक्षिका हिना शेख मॅडम,उपनिरीक्षक श्री अमोल माळी,शहर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार श्री हिंदुराव चरापले.महिला दक्षतेच्या सौ भारती चंगेडिया,निर्मला मोरे,ललिता पुजारी,शुभांगी शिंत्रे,रेखा सारडा,रेणू झंवर,संगीता मुंदडा,अनिता जैन,प्रणिता डाळ्या,अश्विनी कुबडगे,नजमा शेख,पूनम जाधव,गीता कुरुंदवाडे,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगांवे तसेच पोलीस बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post