डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाला ‘एन.बी.ए.’ मानांकनप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी  ता. १८ ऑगस्ट . येथील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशन (एन.बी.ए.) समितीकडून तीन वर्षासाठी मानांकन प्राप्त झाले आहे.  अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एन.बी.ए. मानांकनाला फार महत्व आहे. टेक्स्टाईल डिप्लोमा मधील डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चर्स, डिप्लोमा इन टेक्स्टाईल  टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅशन अ‍ॅन्ड क्लोदींग टेक्नॉलॉजी या सर्व शाखांना एकाचवेळी मानांकन मिळाले आहे.  

एन.बी.ए. ही राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळया व्यावसायिक अभ्यासक्रमांना मानांकन देण्याचे काम करते.  समितीने दिनांक २७ मे २०२२ ते २९ मे २०२२ रोजी एन.बी.ए. समितीने टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील डिप्लोमा पदविकाची शिक्षण प्रणाली, सर्व सेवा सुविधा, प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता व उपलब्धता विभागस्तरावरील कागदपत्रे यांची तपासणी केली होती.  यामध्ये टिचींग अ‍ॅन्ड लर्निंग प्रोसेस, रिसर्च अ‍ॅन्ड कन्सल्टन्सी, स्टूडंट सक्सेस रेट, करिअर गाईडन्स, ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांचा फिड बॅक, आऊटकम बेस्ड एज्युकेशन यांचे सर्वकष मुल्यमापन केले.  पदविका  सर्व विभागातील वर्कशॉप्स, लॅबोरेटरीज, मध्यवर्ती ग्रंथालय, वसतिगृह यांना भेट देवून पाहणी केली

डीकेटीई संस्थेने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता तंत्रशिक्षण पदविकेचे व्दार खुले केले.  आणि वस्त्रनगरीत टेक्स्टाईल डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुरुवात झाली.  राष्ट्रीय स्तरावरील एन.बी.ए. मानांकनाने डीकेटीईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी काढले.

टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाने स्थापनेपासूनच सर्वांगीण प्रगती साधली आहे.  दर्जेदार तंत्रशिक्षण देण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि भविष्यातील प्रगतीकरीता आवश्यक असणारे संशोधन या बाबींवर भर दिला आहे.  संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे आणि व्यवस्थापन मंडळाचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच हे मानांकन प्राप्त झाल्याचे इन्स्टिटयूटचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले यांनी नमूद केले.  

मुल्यांकन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ. सपना आवाडे, इन्स्टिटयूटचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, उपसंचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, प्रा.आर.के. वळसंग, प्राध्यापक, प्राध्यापिका वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post