व्यंकटेश सहकारी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

          चेअरमनपदी अशोक स्वामी :


 व्हा. चेअरमनपदी नानासो गाठ यांची निवड

प्रेस मीडिया लाईव्ह :

हुपरी येथील श्री.व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेल्या नूतन संचालकांची बैठक गिरणीच्या कार्यस्थळी आज गुरुवारी पार पडली. या बैठकीत चेअरमनपदी अशोक  स्वामी यांची तर व्हाईस चेअरमनपदी नानासो गाठ यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळचे अध्यासी अधिकारी प्रेमदास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

हुपरी येथील श्री.व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी या संस्थेने अत्यंत पारदर्शी कारभार करत सभासद व कामगार वर्गाचे हित जोपासले आहे.त्यामुळे या संस्थेने सहकार क्षेञात वेगळा ठसा उमटवला आहे.नुकतीच या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.बिनविरोध निवडून आलेल्या नूतन संचालकांची बैठक गिरणीच्या कार्यस्थळी आज गुरुवारी पार पडली.या बैठकीत चेअरमनपदी अशोक  स्वामी यांची तर व्हाईस चेअरमनपदी नानासो गाठ यांची निवड करण्यात आली. यानंतर अध्यासी अधिकारी प्रेमदास राठोड यांच्या हस्ते नूतन  चेअरमन अशोक स्वामी , व्हाईस चेअरमन नानासो गाठ यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन चेअरमन अशोक स्वामी यांनी सर्व सहका-यांना सोबत घेवून संस्थेची यशस्वी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू ,अशी ग्वाही दिली.व्यंकटेश शेतकरी सूतगिरणीच्या नूतन संचालक मंडळात सर्वश्री ॲड. सौ. अलका स्वामी, दिलीप मुथा, चंद्रकांत वडते, बाबासाहेब कित्तुरे, विश्वनाथ मेंटे, संतोष जानवेकर, अरुण बंडगर, सौ. वैशाली कदम  सौ. राजश्री सावंत , शेखर खोत , अशोक पाटील , रावसो विठ्ठाण्णा, रविंद्र पाटील , बापूसो मंडले , माणिक पतंगे , यांचा समावेश करण्यात आहे.या निवडीबद्दल सर्व नूतन पदाधिकारी व संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post