क्रिएटिव्ह नाईट चेस अकॅडमीचे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्याहस्ते शानदार उदघाटन
( क्रिएटिव्ह नाईट चेस अकॅडमच्या उदघाटन प्रसंगी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे बोलतांना.शेजारी संजय कागडे,राकेश पवार,अभिषेक देशपांडे )

प्रेस मीडिया लाईव्ह :

डोंबिवली : -   बुद्धिबळ या खेळात नवनवीन तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेसोबतच कौशल्य विकसित होत आहे त्यामुळे खेळाडूंनी अद्ययावत रहायला हवे असे आवाहन जागतिक बुद्धिबळ खेळाडू ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी केले. बुद्धिबळ ह्या खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी स्थापन केलेल्या क्रिएटिव्ह नाईट चेस अकॅडमीच्या  उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. 

( क्रिएटिव्ह नाईट चेस अकॅडमी च्या वतीने प्रवीण ठिपसे यांचा सन्मान करतांना अभिषेक देशपांडे संजय कागदे,राकेश पवार )

 डोंबिवलीच्या शांतीनगरातील गजानन हाईटस् येथे आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंडचे अध्यक्ष ऍड संजय कागदे  तसेच अकँडमीचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक देशपांडे, प्रशिक्षक राकेश पवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्रवीण ठिपसे यांनी बुध्दीबळ खेळाडूंनी कठोर मेहनत घ्यायला हवी असे सांगून  खेळाडूंचा बौध्दिक विकास करायचा असेल तसेच  त्यांच्यामध्ये खेळासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन ठिपसे यांनी केले. याप्रसंगी बुद्धिबळ खेळातील भरीव स्वरुपाच्या योगदानाबद्दल अकॅडमी तर्फे प्रवीण ठिपसे यांचा ऐतिहासिक परंपरेचे एक प्रतिक असलेली पुणेरी पगडी, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अकॅडमीच्या उदघाटनाच्या निमित्ताने 


क्रिएटिव्ह नाईट चेस अकॅडमी च्या उदघाटंन प्रसंगी प्रवीण ठिपसे, अभिषेक देशपांडे

वेदांत बंगेरा, सोहम जमदग्नी,शर्वील गोमरे,अथर्व दामोदरे, स्वरा यादव,यश पाटील, अवनी पाटील, प्रणव ठोंबरे,नेहल राजपूत,सानवी सावंत,चिन्मय अय्यर या खेळाडूंनी बुद्धिबळ खेळात  विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या हस्ते या अकॅडमीच्या  खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत बाळकृष्ण देशपांडे, जयश्री देशपांडे यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन प्रकाश देशपांडे यांनी केले. आभार प्रशांत ओक यांनी मानले.


Post a Comment

Previous Post Next Post