पुण्यातील चंदननगर परिसरातील पठारे वस्ती भागात एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

पुर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  पुण्यातील चंदननगर परिसरातील पठारे वस्ती भागात एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. यात तरुणाला तीन गोळ्या लागल्या आहेत.अक्षय प्रकाश भिसे (27) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अक्षय हा कचरा वेचक म्हणून काम करतो. रविवारी सकाळी चंदननगर परिसरात तो एकनाथ पठारे वस्ती भागातील एका मंदिराजवळ थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यवर पिस्तुलातून गोळीबार केला. यात अक्षयला तीन गोळ्या लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली.

दोन दिवसापूर्वीच सिंहगड रस्त्यावर दहीहंडीच्या दिवशी एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर आता ही घटना घडल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगार मोकाट सुटले असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post