ब्रेकिंग न्यूज : गणेश उत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांस बंदी आदेशप्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील


दरवर्षी गणेश उत्सव कालावधीत उत्सव निमित्ताने कोकणाकडे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ६ ने ये-जा करणा-या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सदर मार्गावर जड वाहने, रेतीची वाहतुक करणा-या वाहनांचाही वावर जास्त असल्यामुळे वाहतुक कोंडी होवुन परिणामी नागरीकांची गैरसोय होते. त्याकरीता सार्वजनिक हितास्तव मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ मधील तरतुदीचा वापर करून महाराष्ट्र शासन क्रमांक एमव्हीआर-०८२२/ प्र.क्र. १३९ /परि-२ दिनांक २३/०९/२०२२अन्वये पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गावरून होणारी वाळू/रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहेत.

 खालील नमुद कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सर्व वाहने ज्यांची क्षमता १६ टनकिंवा १६ टन पेक्षा जास्त आहे असे जड अवजड वाहने वाहतुकीस पुर्णतः बंद करण्यात आली आहे. १. दिनांक २७/०८/२०२२ रोजी ००.०१ ते दिनांक ३१/०८/२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत

Post a Comment

Previous Post Next Post