बेडकिहाळच्या विशेष ग्राम सभेत विधवा महिला सन्मान ठरावास मंजुर . ग्रामसभेस शेकडो महिलांची उपस्थिती .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

   बेडकिहाळ, ता - ३ -  गेल्या दोन महिन्यापासून साहित्य संस्कृती आणि शेती सोशियल फौंडेशन च्या,  वतीने विधवा सन्मान कायद्यासाठी जोरदार पणे जण जागृती पर  मोहीम राबविण्यात  आली असून,  या साठी  मंडळाचे सर्व पदाधिकारी,पत्रकार महिला वक्कुटच्या प्रतिनिधी यांनी  महिला मंडळाच्या  सदस्यांन सह स्वसाहाय्य संघाच्या सदस्यांना प्रत्येक्ष भेटून   व बैठकीद्वारे विधवा महिला सन्मान  कायदा  व शोषित महिलांसाठी जनजागृती केली. तर या विषयी  ग्राम पंचायत बेडकिहाळ   यांच्या वतीने १ जुल्ले  २०२२ रोजी सामान्य सभेत या बाबत विचार करून या साठी विशेष ग्राम सभा आयोजित करण्याचे ठरविले.   या  अनुषंघाने  बुधवार ((ता ३ )रोजी विठ्ठल मंदिरा मध्ये ग्राम पंचायत अध्यक्षा. विध्या देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले.  साहित्य संस्कृती शेती, विचार मंच चे अध्यक्ष डि एन दाभाडे उपाध्यक्ष अभय खोत, प्रकाश पाटील किणीकर,  बंडा काका जोशी, सुरेश देसाई, शिवाजी पाटील, प्रधान कुंभार, हसन मुल्ला, तकधीर जमादार,   तसेच ग्राम पंचायत सदस्य, सदस्या यांच्या उपस्थित झालेल्या या सभे प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी अशोक झेंडे यांनी केले. 

  तर या कायद्या संधर्भात ग्राम पंचायत उपाध्यक्षा जयश्री जाधव, सुप्रिया पाटील, सदस्या महादेवी यादव, दीपा जाधव,  सविता पाटील,   हेमलता बिजले, वाणी कंचीबैल, मनीषा मोरे,  कृष्णा आरगे, बंडा जोशी,  सुरेश देसाई, डॉ विक्रम शिंगाडे, गजानन पाटील, आदींनी या कायद्याच्या माध्यमातून महिलांना होणार उपयोग, या समंधी आपले मनोगत व्यक्त केले. 

   या वेळी अध्यक्षा विद्या देसाई म्हणाल्या महिलांच्या सन्मानार्थ हा कायदा होणारच असून  या साठी बेडकिहाळ ग्राम पंचायतीच्या वतीने पहिला ठराव विधान सभेवर पाठवित आहोत, हा एक अभिमान आहे.   तर  गांवाच्या दृष्टीने   कौतुकाची बाब  आहे. तेव्हा या ठरावाचा विचार सर्व लोक प्रतिनिधींनि हि करून आवाज उठविले पाहिजे. महिलांच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा ठराव पास करावा . तर या साठी आम्ही सतत पणे कार्यरत राहू.  

     दाभाडे म्हणाले विधवा सन्मान कायदा झाल्या मुळे महिलांना एक प्रकारे आत्मविश्वास व वेगळी ऊर्जा मिळणार असून  जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो.  समाजात बघण्याची दृष्टीने बदलतो. तेव्हा विधवांच्या सन्मानार्थ व महिलांच्या रक्षणार्थ विधवा सन्मान कायदा झालाच पाहिजे. यासाठी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांच्या उपस्थितीत राज्यात पहिला ठराव घालून पाठवत आहोत. यासाठी लोक प्रतिनिधी हि पाठपुरावा करून सरकार दरबारी   लवकरात कवकर पास करावा. 

 या वेळी ग्राम पंचायतिच्या  विशेष सभेत शेकडो महिलांनी हातउंचावून  टाळ्या वाजून    ठरावास मंजुरी दिली. नंतर ठरावाचे प्रत  पंचायतीचे लेखनिक शिवप्रसाद शेट्टी यांनी वाचून दाखविली. या वेळी अशोक झेंडे म्हणाले बेडकिहाळ मध्ये पहिल्यांदाच या ग्राम सभेत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग मिळाअसून आपल्या कोणत्याही कामासाठी व सरकासरी योजने साठी आम्हास भेटा.

   या सभेस ग्राम पंचायतिचे सदस्य, सदस्या, अशा व अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, महिला संघाच्या प्रतिनिधी व सदस्य महिला, मान्यवर नागरिक, साहित्य संस्कृती शेती सोशियल फौंडेशनचे सर्व सदस्य, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्राम पंचायत सदस्य जीवन यादव यांनी केले तर आभार ग्राम पंचायत सदस्य प्रमोदकुमार पाटील यांनी मानले.

 


Post a Comment

Previous Post Next Post