राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या दणक्यामुळे

 सांगलीतील सेतू कार्यालयचा कारभार सुता सारखा  सुरळीत.


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली : मागील  सहा सात दिवसा मागे सर्वर डाऊन आहे या नावाखाली सांगलीतील राजवाडा येथील एकात्मिक सुविधा केंद्र म्हणजे सेतू कार्यालय बंद होते. त्या ठिकाणी आम्ही भेट दिली असता त्यावेळेला अनेक हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक ,विधवा, परितक्त्या ,व अनेक कामासाठी लागणारे दाखले न मिळाल्यामुळे त्यांचे हाल अपेष्टा बघवत नव्हते म्हणून  तेथील अधिकाऱ्यांना सेतू कार्यालय बंद का आहे याचा जाब विचारला असता  त्यावेळेला तेथील कर्मचाऱ्यांनी वरून सर्वर डाऊन असल्यामुळे येथील सेतू कार्यालय बंद आहे अशी सांगितले होते. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितले की बाहेर सर्व काही सुरळीत चालू आहे तिथे दहा पट पैसे आकारून त्या ठिकाणी ते दाखले मिळत आहेत परंतु तुमचं काम बंद का आहे . त्यावेळेला आम्ही त्यांना जर सांगली सेतू कार्यालय हे दोन-तीन दिवसात चालू न झाल्यास प्रसंगी त्या अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशाराही दिला होता.

आज दोन-तीन दिवसांनी त्या ठिकाणी भेट दिली  असता व तेथील सर्व कर्मचाऱ्यांशी चौकशी केली असता आता सर्व काही सुरळीत चाललंय असे सांगितले गेले. परंतु या ठिकाणी अजूनही लोकांचे गर्दी का  आहे असे विचारले असता त्या ठिकाणी अजूनही स्कॅनर ची गरज आहे स्कॅनर कमी पडत आहे असे सांगितले यावरून अधिकार्‍याची चर्चा केली असता अजूनही दोन-तीन स्कॅनर वाढवावे लागतील जेणेकरून लोकांना खूप काळ ताटकळत बसता यावे लागणार नाही. तसेच त्यांनी पुढे सांगितले की येतील सेतू  केंद्र हे गुजरातच्या गुजरात इन्फोसिस या कंपनीला भाडेतत्त्वावर चालवण्यास दिले आहे परंतु  आम्ही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली असले पाहिजे जर भाड्याने द्यायचेच असेल तर ते महाराष्ट्रातील व सांगलीतील एखाद्या कंपनीला द्यावे जेणेकरून एखाद्या भूमिपत्रा च्या हितेच राहील व इथलं सांगली करांचे भलं होईल असा विचार करावा या वेळेला  झालेल्या कामा बदल तेथील कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांचे आभार मानले  या वेळेला अनमोल पाटील, श्रीकांत कोळीगीरी, काशिनाथ आलदर, स्वप्नील शेटे, सुशांत कदम निखिल सकटे, महिंद्र माने,सागर बडोदेकर, अविनाश जाधव व इतर उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post