शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या निलंबनावर. कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टात आज आमदारांच्या अपात्रते बाबतची सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टात आज आमदारांच्या अपात्रते बाबतची सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणी घटनापीठ स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, घटनापीठ स्थापन करण्यास विलंब होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोर्ट या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ कधी स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अपात्र आमदारांच्या निलंबनावर आज कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणावर कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. मात्र, पुढील सुनावणीची तारीख दिलेली नाही. त्यामुळे घटनापीठ बसल्यावरच नवीन तारीख दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दोन्ही गटाच्या आमदारांवर तोपर्यंत कारवाई होणार नाही.

दरम्यान, हा खटला शिवसेनेचे भविष्य ठरवणारा आहे. ह्या निकालात जर न्यायालायाने 16 आमदारांवरची कारवाई पात्र ठरवली तर शिंदे सरकार अडचणीत येऊ शकते. त्यामुळे शिवसेनेेचे वकील हा खटला लवकरात लवकर निकालात काढण्याची मागणी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post