राज्यातील शिंदे- भाजप सरकारने बहुमत चाचणी मते तब्बल 164 मते मिळवून बहुमत जिंकलं



प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई : राज्यातील शिंदे- भाजप सरकारने बहुमत चाचणी मते तब्बल 164 मते मिळवून बहुमत जिंकलं आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे.विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शिरगणनेद्वारे बहुमताची चाचणी करण्यात आली.

आज सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे यांच्याबाबत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बहुमताच्या चाचणीस सुरुवात केली. यावेळी शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी शिंदे व भाजपला मते दिली. यावेळी १६४ मतांनी शिंदे विजय मिळवत शिंदे - भाजप सरकारने बहुमताची चाचणी जिंकली


शिंदे सरकार अग्निपरीक्षेत उत्तीर्ण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सुहास कांदे यांनी 144 आणि बालाजी कल्याणकर यांनी 145 आकडा घेताच सरकारमधील सदस्यांनी जल्लोष केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सरकार सलग दुसऱ्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सरकारच्या बाजूने 164 मतं मिळाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही सरकारच्या बाजूने 164 मतं होती. राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर संतोष बांगर शिंदे गटात सहभागी झाल्याने हा आकडा 164 वर राहिला. तर बांगर वगळता अन्य कोणतेही आमदार शिंदे गटात सहभागी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post