ग्रामसेवक अकिवाटे यांनी दिलेला खुलासा हा अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा आहे.

  ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांनी  पूर्वतयारीचा ठराव केल्याचा खुलासा गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना दिल्याने या प्रकरणाचे आणखी गूढ वाढले आहे.

गणेश पाखरे या लाभार्थ्याला ग्रामपंचायतच्या ठरावाच्या प्रती सादर करण्यास सांगितले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

खिद्रापुरात ऐलान फाऊंडेशनच्या बांधकामाच्या करारपत्रासाठी कायदेशीर सल्लागारांचे मार्गदर्शन मागणी, बांधकामाचे प्लॅन-रेखांकनमागणी व बांधकामासाठी समिती नियुक्ती असे तीन ठराव ग्रामपंचायतीने केले होते, तरीही ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांनी घरकुलाच्या बांधकामांच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा ठराव केल्याचा खुलासा गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना दिल्याने या प्रकरणाचे आणखी गूढ वाढले आहे.

दरम्यान, गणेश पाखरे या लाभार्थ्याला ग्रामपंचायतच्या ठरावाच्या प्रती सादर करण्यास सांगितले आहे. पुन्हा नोटीस देऊन सखोल चौकशी करणार असल्याचे विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे यांनी सांगितले. १२ ऑगस्ट २०२० रोजी मासिक सभेत विषय क्रमांक ९ वर ऐलान फाऊंडेशनतर्फे ७० घरांचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या अटी, शर्तीचा करारपत्र करण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन घेण्याचा ठराव करण्यात यावा, असे अकिवाटे यांनी सांगत सविस्तर माहिती सभेपुढे मांडल्याचे नमूद केले. बांधकामासाठी गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रा. पं. सदस्य अशा आठ सदस्यांची नियुक्ती

करून समिती गठीत केली आहे. सूचक बाबासो चिकोडे होते. अनुमोदन विजय रायनाडे यांनी दिल्याचा उल्लेख आहे. तीन ठराव झालेले असताना ग्रामसेवक अकिवाटे यांनी दिलेला खुलासा हा अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत ग्रामसेवक अकिवाटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही फाऊंडेशनने ७० घरांचे बांधकाम करून देण्यासाठी जिल्हा परिषदेशी करार केला आहे. ग्रामपंचायतीने नाही.


Post a Comment

Previous Post Next Post