सा महाराष्ट्राची भूमीचे संपादक तथा रायगड भूषण रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त इ १०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

 रायगड जिल्हा : सुनील पाटील

  सा महाराष्ट्राची भूमीचे संपादक तथा रायगड भूषण रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त इ १०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा तसेच निगडोली येथील मा संरपंच अनंत पाटील यांची सुकन्या कु  डॉ.चैताली  अनंत पाटील हिने एम बी बी एस पदवी(डॉक्टर)पदवी संपादन केल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.

खालापूर तालुका आदिवासी भवनास महापुरुषांचे फोटो भेट,१ली ते ४थी च्या व. खोडावाडी अंगणवाडीच्या मुलांना पारले कंपनीकडून बिस्किटे वाटप करण्यात आली.

फुले, शाहू आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते,सा महाराष्ट्राची भूमीचे संपादक तथा रायगड भूषण रविंद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इ १०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अलिकडेच साजरा करण्यात आला.यावेळी. महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तदनंतर स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी खालापूर प .स .चे  गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सेवानिवृत्त अधिक्षक मनोहर पत्की,नडोदे गु्प  ग्रामपंचायतीचे मा संरपंच अनंत पाटील, बहुजन पॅथरचे लक्ष्मण गायकवाड ,डॉ चैताली अनंत पाटील मुख्याध्यापक कडू सर  वर्षा जाधव, तुषार जाधव, दिलिप डाके, मारूती पवार, संपादक रविंद्र विष्णू जाधव आदी  मान्यवर उपस्थित होते.

सत्कारमूर्ती रविंद्र विष्णू जाधव यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.केक कापून रविंद्र विष्णू जाधव याचे अभिष्टचिंतन केले यावेळी डॉ.चैताली हिने १०वी च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले रवि काकांचे ही अभिनंदन केले.आपल्याला मोठे  होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते . सातत्य, एकाग्रता   ही टिकवणे महत्त्वाची बाब लक्षात घेऊन अभ्यास केला तर यशाची शिखर गाठण्यासाठी अवघड काही नाही असे त्यांनी आपल्या मनोगतात आपले विचार व्यक्त केले.रविंद्र जाधव यांनी लहान पणापासून ते आतापर्यंतचा प्रवासाचा जीवनपट च मांडला.आईवडिलाच्या आशिर्वादाने व दादा वहिनीच्या सहकाऱ्यांमुळे माझ्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली.मी शिकलो पदव्या मिळविल्या विविध प्रकारचे पुरस्कार , सन्मान, रायगड भूषण पुरस्कार मिळून मी धन्य झालो या सर्व पाठिमागे त्याचा मोलाचा वाटा आहे.हे कदापि विसरणार नाही .असे गौरवोद्गार त्यांनी काढले व इ १०वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

अनंत पाटील यांनी सांगितले की,आजचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा दुहेरी कार्यक्रम आहे एकिकडे १०वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार तर दुसरीकडे समाजोपयोगी समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.रविंद्र जाधवाचा कार्याचा आढावा घेतला असता ते  महाराष्ट्राची भूमी चे संपादक आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम लेखनीतून सोडवित असतात.रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे दर वर्षी.इ१०वी च्या यशप्राप्ती केलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान करतात .आपली प्रबळ इच्छा शक्ती पाहिजे ध्येय ठेवा नक्की  यश येणारच मला काय व्हायचे आहे मेडिकलला जायचे की, इंजिनिअर ला ते अगोदर ठरवा मगच आपले क्षेत्र निवडा आहे.

असा मौलिक सल्ला तसेच रविंद्र विष्णू जाधव यांना शुभेच्छा दिल्या.तसेच मनोहर पत्की यांनी सांगितले की,१०वी च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करून सामाजिक जबाबदारी चे भान पाळायला पाहिजे कोणी तरी खारीचा वाटा उचलायला हवे आहे ते रविंद्र जाधव हे आपल्या तून करीत आहेत असे जर सर्वांनी केले तर देश महासत्ता कधीच बनेल.जास्तीत जास्त अभ्यास करून उज्ज्वल यश कसे मिळेल.एक नंबर ला आपण कसे राहू यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.शेवटी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जीवन जगत असताना आपल्या वर मोठी जबाबदारी असते ती म्हणजे आईवडीलांचे, समाजाचे,देशाचे ऋण आपण फेडले पाहिजे.रविने आपल्या मनोगतात म्हटले आहे की, गरीबी तून कशा पद्धतीने शिक्षण घेऊन मोठा झालो, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले  या सगळ्या ऋणातून मुक्त झालो.हे उभे करण्यामागे,आई वडिलांचे ऋण आहेत च . पंरतु दादा वहिनीचा मोलाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले, दरवर्षी गुण वंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, व्यक्तीचा सन्मान करीत आहेत हे एक अतिशय चांगले कार्य त्यांच्या हातुन घडत आहे असे च समाजसेवेचे कार्य घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापक कडू सर यांनी करुन सर्वाचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमासाठी  गावातील प्रतिष्ठित नागरिक ,शाळेची मुले, मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post