खालापूर तालुक्यातील हाळ गाव येथे श्री सदस्य यांनी केली वृक्ष लागवड



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी खालापूरचे तहसीलदार अयुब तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हाळ गाव येथे वृक्ष लागवड करण्यात आली. श्री सदस्यांनी या भागात पिंपळ, निलगिरी, कडुलिंब, ताम्हण, करंज, अर्जुन, रिठा, गुलमोहर, ऑस्ट्रेलियन सुबाबुळ, बेहडा यांसारख्या वृक्षांची लागवड केल्याबद्दल तहसीलदारांनी कौतुक केले.

दरम्यान आम्ही वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संवर्धन करणार असल्याचे यावेळी श्री सदस्यांनी सांगितले. याप्रसंगी खालापूरच्या तहसीलदारांसोबत वन अधिकारी कर्मचारी व या भागातील

श्री सदस्य उपस्थित होते. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करताना प्रत्येक सदस्य स्वतःजवळ असलेली पदवी विसरून सामाजिक कार्यास हातभार लावत असल्याचे पाहायला मिळत असून यामुळे अनेक ठिकाणी वनराई फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले. वृक्ष लागवड केल्याने पर्यावरणाचा ढासळलेला समतोल अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदारांनी यावेळी सांगितले.

वृक्षांची लागवड वन विभागाच्या जागेत करण्यात आली असून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जात असल्याने पावसात वाढलेले गवत, झुडपे श्री सदस्यांनी साफ केल्याने त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. सर्वांनी आपापल्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. -अयुब तांबोळी,

तहसीलदार, खालापूर

Post a Comment

Previous Post Next Post