बांधवांनो आता नाही तर पुढे केव्हाच नाही नंतर वेळ निघून गेलेली असेल



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा  : सुनील पाटील

विचुंबे ,पनवेल मधून  जयवंतराव पोकळे

  बांधवांनो आता तरी जागे व्हा नाहीतर हे शासनकर्ते तुम्हाला मुंबईतुन हद्धपार केल्या शिवाय राहणार नाहीत आज श्रीमती शारदा नाखवा , वर्सोवा कोळीवाडा या ६५ वर्षाच्या विधवा भगिनीचे  गेल्या ५० वर्षापूर्वीचे राहते घर मुंबई महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने कोणतीही नोटीस व पूर्वसूचना न देता या माऊली आपल्या उदरनिर्वाहा करिता मासे विकावयास घराला कुलूप लावून गेल्या असता भर पावसात त्यांचे घर तोडले ही  मानवतेला काळीमा फासणारी घटना केली याचा आम्ही जाहीर रित्या निषेध करतो.आता फक्त निषेध करून व व्हाट्स एपच्या व फेसबुकच्या माध्यमातून या बाबत सहानभूती देऊन आपण शांत बसू नका भावांनो आज या शारदा नाखवा या आपल्या भगिनी "जात्यात आहेत व आपण सर्व सुपात आहोत" हे लक्षात असुद्या व आपणही केव्हाही ज्यात्यात जाऊन भरडले जाऊ याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे हा फक्त शारदा ताईंचा प्रश्न राहिला नाही तर हा मुंबईतील सर्व कोळीवाड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे* 

   पहिला त्यांनी आपल्या माता भगिनिंचे उदरनिर्वाहाचे मच्छीमार्केट च्या मोक्याच्या जागेवर डोळा ठेऊन धनाढ्य बिल्डरांना हाताशी धरून हे महाभाग  मुंबईमहानगर पालिकेचे सत्ताधारी व अधिकारी यांची अभद्रयुती होऊन करोडो रूपायांचा मलिदा घेऊन त्यांचे मच्छीमार्केट तोडले जात आहेत व त्यांना मुंबईतुन उपनगरात व नवीमुंबईत हाकलून लावण्याचे षड्यंत्र आखले आहे व आता आपल्या कोळीवाड्यावर या हारामखोरांची वक्रदृष्टी पडली असून त्यांनी आपले सर्व कोळीवाडे हे झोपडपट्टी निर्मुलन (एस्.आर्.ए ) योजनेखाली नेऊन त्या ठिकाणी हे हरामखोर सत्ताधारी बिल्डरांना उत्तुंग इमारती बांधण्यास परवानगी देत सुटले आहेत व आपले हक्काचे पिढ्याने पिढ्या असलेले कोळीवाडे नष्ट करीत आहेत हे लक्षात घ्या यापुढे आपण फक्त नावानेच या मुंबईचे "आद्य नागरिक "  आहोत हे आपल्या पुढील पिढीला फक्त पाठ्यपुस्तकात वाचावयास मिळतील यात शंकाच नाही असे वाटते.

           तरी आम्ही आपणास विनंतीवजा नम्रपणे जाहीर आहावन करतो की आता हा विषय फक्त शारदा मावशीचाच राहिला नसून हा भविष्यात आपला सर्वांचा विषय होऊन आपल्या बोकांडी बसला आहे व या करिता आपणास आता कायदेशीर लढा उभारावा लागेल व त्यात कोळीवाडे आपले गावठाण हद्धीचे सीमाकांन करून व त्यांची भक्कम बाजू न्यायालयात मांडावी लागेल या करिता त्यास आर्थिक बाबींची जरूरत निर्माण होत आहे तरी बांधवांनो आज पर्यंत आपण ज्या प्रमाणे व्हाट्सएपच्या व फेसबुकच्या माध्यमातून सहानभूती दाखवून सहकार्य केलेत त्या प्रमाणे आपण या बाबत  एक सामाजिक बांधिलकी म्हणून यताशक्ती मदत करावी ही आपणास नम्र विनंती करून आता आपण सर्व मिळून हा कायदेशीर लढा उभारूया.*

   *धन्यवाद !!

       *जय एकविरा !! जय महाराष्ट्र !!*

          कोळी समाज नेते

       *जयवंतराव सु .पोकळे अध्यक्ष* 

       *महाराष्ट्र कोळीवाडा संघ रायगड*

      

Post a Comment

Previous Post Next Post