सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पात्रता फेरीतच बाद

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पात्रता फेरीतच बाद


 प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वर्ष २०१८  मध्ये शैक्षणिक पात्रता शिबिर आयोजित केले होते. त्यानंतर अद्याप शैक्षणिक पात्रता शिबिर घेतले गेलेले नाही असे निदर्शनास आले. दरवर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता तपासलली  जात असते. या संदर्भात वेळोवेळी झालेले बदल अधिकार मंडळांनी घेतलेले निर्णय यांचा समावेश असतो.

परंतु गेल्या चार वर्षात शैक्षणिक पात्रता शिबिर झालेले नसल्याने अधिकार मंडळांचेही लक्ष नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित माजी कुलगुरू तीन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत.  वर्ष २०१८  मध्ये शैक्षणिक पात्रता विभागाचे प्रशासकीय प्रमुख व उपकुलसचिव हे त्यावेळी सेवानिवृत्त झाले तदनंतर आजपर्यंत तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपकुलसचिव पदाचा कार्यभार सोपविला गेला. परंतु त्यांना देखील अद्याप हे कसे लक्षात आले नाही.? असा प्रश्न उपस्थित होतो.  आता नवीन कुलगुरू व अधिकार मंडळे यांची येत्या चार महिन्यात नेमणूक होईल. यामुळे सध्या असलेल्या अधिकार मंडळांना फक्त दोन ते तीन महिने कालावधी राहिला असल्याने याकडे कदाचित दुर्लक्षही झाले असल्याची   शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठाचे मानांकन घसरण्यासाठी हे एक कारण असू शकते का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पात्रता फेरीतच बाद झाल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post