सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय शिक्षा योजना अंतर्गत सूचना मागविण्याचे राजकारण....

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आय.क्यू.ए.सी.विभागाने विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांस राष्ट्रीय शिक्षा २०२०  योजनेअंतर्गत शैक्षणिक स्वरूपाच्या सूचना मागविल्या आहेत. परंतु यातील खेदाची बाब अशी की यापूर्वी असे कर्मचारी सेवेत असताना कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा अभिप्राय किंवा दुरुस्त्या त्यांच्याकडून मागविल्या गेल्या नव्हत्या.  उलट अशा कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना  कोविड १९( कोरोना ) सारख्या बिकट परिस्थितीत  विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेत (विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील सेवक, प्राध्यापक, विद्यापीठातील कर्मचारी,अधिकारी,तांत्रिक विभाग ) सुचविलेल्या बदलांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली आहे .         

 




सध्या विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकांचे आयोजन होत असल्याने पदवीधर उमेदवारांची सहानुभूती आपल्याकडे वळवून मते गोळा करण्याचा हा प्रकार असावा, अशी देखील चर्चा होत आहे. कदाचित शैक्षणिक धोरणांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील समाविष्ट करून घेण्याचा हा एक वेगळाच प्रयत्न असावा. परंतु राष्ट्रीय शिक्षा योजना  २०२०  मधील प्रश्नावली पाहता, ही सर्व माहिती प्राध्यापक, शैक्षणिक विभाग प्रमुख यांच्याशी संबंध असलेल्या अभ्यासक्रम ,  शैक्षणिक धोरण इत्यादी संदर्भातील आहे.

Post a Comment

Previous Post Next Post