म्हाळुंगे गावात २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली.

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली .

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली .


 या कामाची पाहणी मा.अतिरिक्त आयुक्त श्री. विलास कानडे साहेब, उपायुक्त श्री. नितीन उदास साहेब  यांनी केली आणि सदर काम महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. संदीप खलाटे सर , मा.उपअभियंता श्री.संजय आदीवंत सर यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक श्री. सुरेंद्र जावळे ,मोकादम श्री. प्रकाश सोवळे, श्री.आकाश शिंदे,श्री.भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात कामपूर्ण केले.

Post a Comment

Previous Post Next Post