निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणारी लेखमाला.....

निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणारी लेखमाला..... 

प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निवृत्ती निकाळजे.

पुणे : नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने प्रभाग रचना, मतदार यादी अद्ययावत करणे अशा कामांना वेग आला आहे. निवडणूक म्हणजे लोकशाही पद्धतीने जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी. आपण निवडणुका जाहीर झाल्या किंवा मतदानाच्या दिवशी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला किंवा पक्षाला मत देतो मतदान करण्यास  पाच- दहा मिनिटे उशीर झाल्यास आपण अस्वस्थ होतो किंवा मतदान  कर्मचारी  अधिकाऱ्यांवर राग व्यक्त करतो. परंतु असे न करता जर निवडणूक कार्यपद्धतीची सर्वसाधारण किंवा सखोल ओळख करून घेणे आवश्यक वाटते.  वर्ष २००९ मध्ये  स्वाइन फ्लू या संसर्गिक रोगाने जगात थैमान घातले होते, अशावेळी भारतामध्ये सार्वजनिक निवडणूक झाल्या होत्या. सध्या कोविड १९ ( कोरोना) या सांसर्गिक रोगांने संपूर्ण जगाला- व्यवस्थांना हादरवून टाकले आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक अंतर, निवडणूक प्रक्रिया, व्यवस्था व जनता यांच्यामध्ये योग्य प्रकारे समतोल व आयोजन केल्यास उपयुक्त ठरेल.  भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु तरीही इतर देशांच्या तुलनेत भारताची लोकशाही सलग ७५  वर्षे टिकून आहे. आपण ज्या लोकशाहीप्रधान देशांमध्ये राहतो त्याची निवडणूक प्रक्रिया देखील जाणून घ्यावी असं वाटते. वर्ष २०१८  पासून विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी लोकशाही, निवडणूका  व सुशासन असा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम सर्व विषय, शाखा व विद्यार्थ्यांना बंधनकारक(अनिवार्य) केला आहे. याकरिता याविषयास  दोन क्रेडिट( आवश्यक गुण) मिळणे आवश्यक आहे. हा भाग केवळ नवीन मतदार असलेल्या विद्यार्थ्यांना लागू होतो. परंतु वर्ष २०१८  पूर्वी शिक्षण घेतलेले किंवा अशिक्षित जनतेला निवडणूक विषयाबद्दल माहिती व्हावी म्हणून ही लेखमाला सुरू केली आहे. तसेच नवीन विद्यार्थ्यांना( पिढीला) लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयाच्या अनुषंगाने काही उपयुक्त माहिती मिळाल्यास कदाचित माझे त्यात यश असेल. निवडणूक प्रक्रिया म्हणजे उमेदवार, पक्ष, राजकारण इत्यादी नसून या प्रक्रियेमध्ये मतदार, उमेदवार, पक्ष, गट, समूह, निवडणूक आयोग, निवडणूक कर्मचारी व अधिकारी इत्यादींचा देखील समावेश असतो. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वच घटकांनी समाविष्ट होणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीच्या महोत्सवात सामील होण्यासारखेच आहे. या लोकशाहीच्या महोत्सवात सामील होणाऱ्या काही  घटकांची माहिती पुढील प्रमाणे:-  लोकसंख्या १२०  कोटी,  ८० कोटी मतदार,  १०  लाख ४८ हजार मतदान केंद्रे,  ४५  लाख ३८  हजार निवडणूक कर्मचारी व अधिकारी, संरक्षण अधिकारी व कर्मचारी इत्यादी. तसेच उमेदवार, पक्ष, समूह, गट  हे वेगळेच. या लेखमालेत निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील तरतुदी, काळानुसार आवश्यक असलेले बदल व सूचना करण्याचा प्रयत्न करीत आहे. या लेखमालेमुळे जास्तीत जास्त व्यक्तींना माहिती मिळेल यात शंका नाही, परंतु मतदानातील सहभागामुळे मतदान टक्केवारी मध्ये भविष्यात वाढ होईल असे वाटते.  सलग १७  तास आधुनिक तंत्रज्ञानाचा व मनुष्यबळाचा वापर करून यशस्वीरित्या मतदान प्रक्रिया चालू असणारे भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे.

क्रमशः 

Post a Comment

Previous Post Next Post