हुपरी नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले

हुपरी प्रशासनाच्या या विशेष निर्णयाचे कौतुक फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण राज्यात होत आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

सौ. प्रमोदीनी माने :

कोल्हापूर : संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत घडली. या नगरपरिषदेने एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक बनवले आहे. तातोबा बाबूराव हांडे असे या नूतन तृतीयपंथी नगरसेवकाचे नाव आहे. आज पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ताराराणी आघाडीने हांडे यांना हा बहुमान दिला.


काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बहुमत असेल तर या राज्याचा मुख्यमंत्री तृतीयपंथी सुद्धा होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. मात्र, प्रत्यक्षात राजकारणात असे चित्र आजपर्यंत पाहायला मिळाले नाही. राजकारणामध्ये नेहमीच तृतीयपंथी यांना संघर्ष करावा लागला आहे. मात्र, संपूर्ण राज्याला आदर्श घालून देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी नगरपरिषदेत घडली. हुपरी प्रशासनाच्या या विशेष निर्णयाचे कौतुक फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण राज्यात होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post