मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वनप्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

  यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, भगवानराव साळुंखे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.Post a Comment

Previous Post Next Post