कोल्हापूरची शिवसेना धैर्यशील माने यांच्या विरोधात आक्रमक झाली

 कोल्हापूर पोलिसांनी धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी आणि परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने कोल्हापूरची शिवसेना धैर्यशील माने यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. खासदार धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी आणि त्यांचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. आज सकाळी मार्केट यार्ड येथे मोर्चाला सुरवात झाली. मार्केट यार्ड ते खासदार धैर्यशील माने यांचे निवासस्थान असणाऱ्या रुईकर कॉलनी असा हा मोर्चा पदक्रांत झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी आणि परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले याचबरोबर धैर्यशील माने यांना मोठी आर्थिक अडचण होती ती दूर करण्यासाठी 200 कोटींचे पॅकेज घेईन त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे, असा आरोप केला. यावेळी संजय पवार, रविकांत इंगवले, यांची भाषणे झाली. भाषणानंतर काही आक्रमक शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.Post a Comment

Previous Post Next Post