स्वच्छ विद्यालय अभियान जिल्हास्तर पुरस्कार प्राप्त शाळांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : (जिमाका): स्वच्छ विद्यालय अभियान अंतर्गत जिल्हास्तर पुरस्कार प्राप्त शाळा व 5 स्टार शाळा अशा एकूण 90 शाळांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम गुरुवार दि. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवन येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथ) आशा उबाळे यांनी दिली आहे.

सर्व शाळांसाठी सन २०१५-१६ पासुन स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरु केलेला आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी जिल्ह्यातील ९९.४६ टक्के शाळांनी स्वयंमुल्यमापन केले होते. यामध्ये शाळेत उपलब्ध पाण्याची व्यवस्था, शौचालय व मुतारीची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल, क्षमता विकास व कोविड १९ च्या अनुषंगाने केलेले कार्य यावर आधारीत प्रश्नावलीनुसार 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार शाळा ऑनलाईन पध्दत्तीने गुणानुक्रमे निश्चित झाल्या. यामधील ५ स्टार मिळविलेल्या ३३४ शाळा ३ स्टार व ४ स्टार मधील ३०९ शाळा अशा एकूण ६४३ शाळांचे मुल्यांकन तालुका बदलुन बाह्य यंत्रणेमार्फत करण्यात आले. 

जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी गुणानुक्रमे एकूण 38 शाळांची निवड करण्यात आली. त्यातील सर्वसाधारण श्रेणीसाठी 8 तर उपश्रेणीसाठी 30 शाळा, सर्व साधारण श्रेणीसाठी ग्रामीण भागातून 3, प्राथमिक व 3 माध्यमिक/उच्च माध्यमिक, शहरी भागातून 2 शाळा, त्यात 1 प्राथमिक व 1 माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळा, उपश्रेणीसाठी ग्रामीण भागातून 12 प्राथमिक व 6 माध्यमिक/उच्च माध्यमिक, उपश्रेणीसाठी शहरी भागातून 6 प्राथमिक व 6 माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा अशा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र असलेल्या ३८ शाळा व 5 स्टार 52 शाळा एकूण 90 शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post