माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत यांचे निधन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंज : प्रतिनिधी  :

इचलकरंजी नगरीच्या माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा रमेश भागवत यांचे मंगळवारी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. प्रारंभी त्या माकपच्या कार्यकर्त्या व नंतर नगरसेविका होत्या. धडाकेबाज भाषण तसेच अभ्यासू नगरसेविका अशी त्यांची ओळख होती. कष्टकरी वर्गाच्या प्रश्‍नांसाठी त्यांनी आवाज उठविला. वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून दिला. पुढे त्या माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षात कार्यरत होत्या.  सन 2011 मध्ये त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 2 आसरानगर येथून निवडून आल्या होत्या. याच काळात त्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. मंगळवारी दुपारी त्यांचे अकस्मिक निधन झाले. येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post