इचलकरंजी :दुर्गंधीचा विळख्यात काळा वडा

इचलकरंजी पालिकेच्या आरोग्य खात्याचे दुर्लक्ष

ठेकेदारांची ठेकेदारी पालिकेने बंद केले पाहिजेत.. डी एम मांजरे.


प्रेस मीडिया लाईव्ह : ( प्रतिनिधी )

 इचलकरंजी सांगली रोड  येथील  काळया वड्याला नावाप्रमाणे  दुर्गंधी मुळे काळे स्वरूप आले आहे .  या दुर्गंधी मुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे, अगोदरच कोरोनाने  धुमाकूळ घातला आहे, त्यात ही दुर्गंधी म्हणजे रोगाला आमंत्रण दिल्यासारखे आहे.


या बाबत महानगरपालिकेचे पूर्ण पणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.  वास्तविक या ठिकाणी साफ सफाई ,  सतत फवारणी करण्याची गरज असताना पालिकेचे ठेकेदार मात्र डोळे मिटून घेतले आहे त , प्रथम या ठेकेदारांची ठेकेदारी पालिकेने बंद केले पाहिजेत, तसेच पालिकेचे मुकादम चाळीस, कामगार वीस अशी संख्या आहे. पालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये मोठे गौडबंगाल आहे  व याची पूर्ण माहिती घेतलेली  असून या बाबत असंख्य नागरिकांची तक्रार आहे असे ऑल इंडिया हुमेन राईट दिल्ली चे कोल्हापूर जिल्हा  अध्यक्ष डी एम मांजरे ( तारदाळकर)  यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post