इचलकरंजी शहरातील नागरिकांना घरबसल्या मोबाईल द्वारे घरफाळा, पाणी पट्टी भरणेची सुविधा येत्या महिन्याभरात उपलब्ध होणार :

प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी नगरपरिषदेच्या कर संकलन विभागामध्ये कराच्या वसुलीसाठी मायनेट या प्रणालीचा वापर करून कराची वसुली केली जात आहे. तथापी ही अत्यंत जुनी व किचकट संगणक प्रणाली असल्यामुळे त्या ऐवजी अद्ययावत सुविधा असलेली चांगली संगणक प्रणाली विकसित करून कर भरणा सुलभ करण्याची  इचलकरंजी शहरातील नागरिकांची मागणी होती. 

 सदर मागणीचा विचार करून अभ्यासपूर्ण प्रस्ताव एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून तत्कालीन प्रशासक, इचलकरंजी नगरपरिषद यांनी तयार केला होता. महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर या विषयावर सलग बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात आलेला असून आज दिनांक ७ जुलै २०२२ रोजी एचडीएफसी बँकेसोबत ही संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच या संगणक प्रणालीच्या विकासा साठी इचलकरंजी महानगरपालिका, एचडीएफसी बँक आणि असेंटेक या सॉफ्टवेअर कंपनीची सामंजस्य करार स्वाक्षरी करण्यात आलेला आहे.

                     मराठी हिंदी न्यूज पोर्टल.

  एचडीएफसी बँक या संगणक प्रणालीचा संपूर्ण खर्च करणार असल्यामुळे या सामंजस्य करारामुळे संगणक प्रणाली तयार करून चालविण्यासाठी महानगरपालिकेच्या अंदाजे रुपये ४० ते ५० लक्ष खर्चात बचत होणार आहे. महानगरपालिकेने यापूर्वीच शहरांमध्ये ४ क्षेत्रीय कार्यालय केलेली असून या कार्यालया मधूनही संकलित कराचा भरणा करता येईल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. याशिवाय इंटरनेट बँकिंग, गुगल पे व इतर सर्व पेमेंट ऑप्शन कर भरणा करण्यासाठी उपलब्ध होणारी असल्यामुळे करदात्यास महानगरपालिकेत रांगेत उभे राहावे लागणार नाही. नजीकच्या काळात नागरिकांसाठी मोबाईल ॲप विकसित केले जाईल. 

  आज सामंजस्य करार स्वाक्षरी करताना इचलकरंजी महानगर पालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक श्री सुधाकर देशमुख, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, मुख्य लेखाधिकारी श्रीमती कलावती मिसाळ, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कर अधिकारी श्रीमती अरिफा नुलकर, एचडीएफसी  बँकेचे क्लस्टर हेड हर्षल मेहकरे, शाखा व्यवस्थापक नितिन पाटील, सेल्स मॅनेजर जोतिबा मोरे, रमेश चरापले असेंटेक या कंपनीचे प्रतिनिधी राहुल मेंघल आदी मान्यवर उपस्थित होते.


  

Post a Comment

Previous Post Next Post