लोकशाहीसाठी हे घातक आहे.



सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घाण पाण्यापेक्षाही घाणेरडे झाले आहे आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुद्धा कोणी फिरकणार नाहीत . या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडियावाले आहेत आणि २४ तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. काय करणार त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार. शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पेरोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत. आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे. कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे यांच्या पेक्षा २०० / ४०० रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे भय्ये लोक परवडले.  इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडिया वाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. 

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा प्लांट न्यूज आणि फेक मीडिया! मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनलवाला सध्या तेच दाखवतोय जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही. शेतकरी, अतिवृष्टी, सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी, उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी, मोठ्या कंपन्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात. टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत आणि लोकांना कंटाळा येईपर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे. त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते... पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनलची टीआरपी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे. कारण अती तेथे माती हे ठरलेलेच आहे. राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत. 

लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडियावर आधीच लोक चिडले आहेत. राहता राहिला सवाल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या विश्वासहर्तेचा तर ती त्यांनी कधीच गमावलेली आहे.इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आणखी एक मोठा धोका म्हणजेदेशातील धार्मिक आणि जातीय तणाव याच लोकांमुळे वाढलाय. कारण नुपूर शर्मा कोणाला ठाऊक होती? या लोकांनी तिचे चर्चा सत्र त्यांच्या चॅनलवर दाखवले आणि तिने मोहंम्मद पैगंबर यांच्या विषयी अकलेचे तारे तोडून देशात धार्मिक तणाव वाढवला त्यातून उदयपूर मध्ये कन्हैय्यालाल आणि अमरावतीत उमेश कोल्हे या दोघांच्या हत्या झाल्या नुपुरच्या विधानाच्या जगभर अशा काही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या की जगात प्रसिद्धीच्या झोतात असलेले पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे कचऱ्याच्या पेटीवर दिसू लागली. नुपूर शर्मा काहीतरी बोलून गेली पण त्याचे परिणाम भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर झाला जगातील सर्व मुस्लिम राष्ट्र भारतावर नाराज आहेत आणि याला कारणीभूत आहे भारतातला इलेक्ट्रॉनिक मीडिया! त्यांनी जर नुपूर शर्माचं चर्चा सत्र टिव्हीवर आयोजित केलं नसतं आणि त्याबाबतच्या हिंसक बातम्यांचे प्रसारण केलं नष्ट तर एवढं महाभारत घडल नसतं म्हणूनच आता इलेक्ट्रॉनिक मिडीयाला पायबंद घालण्यासाठी त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादण्याची आवश्यकता आहे असे लोकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post