अनधिकृत बांधकाम अतिक्रमण हटाव पथक, शासनाचे घटक,प्रशासनाचे अधिकारी, राजकिय मंडळी आणि पुणे शहरातील अनधिकृत अतिक्रमण करणारे नागरिक सारख्याला वारखे.?

अनधिकृत बांधकाम अतिक्रमण एक कर्क रोगा सारखा शहराला विळखा घालून बसला आहे .


प्रेस मीडिया लाईव्ह

  अनवर अली शेख :

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा पडत आहे.अनधिकृत बांधकाम अतिक्रमण एक कर्क रोगा सारखा शहराला विळखा घालून बसला आहे .अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई केली तरी त्रास आणि दुर्लक्ष केले तरी नाराजी व्यक्त केली जाते परंतु संबंधित प्रशासन आणि शासकीय यंत्रणेतील संबंधित प्रत्येक घटकाने वेळीच आपली जबाबदारी पार पाडली असती  तर या रोगाला वेळीच आळा घातला असता तर आज ही परिस्थितीत आली नसती . अशी जोरदार चर्चा चवीने नागरिक शहरातील चौका चौकात करताना दिसत आहेत 

अनधिकृत बांधकाम होत असताना त्या विभागातील तत्काली अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा ठराव पास करून या प्रकरणी आजी - माजी सहाय्यक अभियंता, अधिकारी दोषी आढळल्यास नोटीसा बजावण्यात का येत नाही?

पुणे शहर आणि उपनगरातील भागात तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली त्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बहुमजली इमारती, मोठं मोठें  पत्रा शेड, दुकाननां वर होणाऱ्या कारवाई मुळे कोट्या वधी आर्थिक नुकसान झाले नाही का ? जर सरकारी यंत्रणा, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी अनधिकृत बांधकाम पत्रा शेड अतिक्रमण उभरण्या आधीच रोखल असत तर या एवढ्या प्रचंड मोठ्या अनधिकृत इमारती बांधकाम, पत्रा शेड उभारलेच गेले नसते , आणि आज होणारा त्रास ही झाला नसता, हे एवढं सगळं अनधिकृत अतिक्रमण होत असताना संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी का..? वां कुणाच्या आशीर्वादाने डोळे झाकून गप्प बसतात ?

अनधिकृत बांधकामे सुरू केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल . अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरोधात पालिकेच्यावतीने धडक मोहीम राबवून सक्त कारवाई करण्यात येईल , घरे , दुकाने खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करताना महापालिकेत चौकशी करूनच व्यवहार करावा . जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही अशी घोषणा का करण्यात येत नाही ?

 पुणे ,पिंपरी चिंचवड सारख्या शहरातील सुशिक्षित नागरिक म्हणून मिरवणाऱ्या जनतेने  शासनाला आणि आपल्या विभागातील शासकीय यंत्रणेला पाठ दाखवून किंवा दुर्लक्षित करून  हे अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमणाकचा सपाटा चालविला आहे , हे सगळ पुणे, पिंपरी-चिंचवडकरांणा शोभेल असं कृत्य आहे का ? 

 अनधिकृत बांधकाम अतिक्रमण पेलताना पुणेकरांना तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सुशिक्षित, सुसंस्कृत,सभ्य नागरिकांना आपल्या स्वतःच्या या कृत्या बद्दल आदर भाव की घृणा निर्माण होते ? 

विद्युत जोडणी , पाणी पुरवठा नळ जोडणी अनधिकृत अतिक्रमण  करणाऱ्यांना का देता..?

 अवैध बांधकामांवर प्रखरपणे बंधने आणायची असतील तर राज्य प्रशासनाचा एक भाग असणाऱ्या महावितरण विभागाने विद्युत जोडणी देऊ नये . तसेच नियमबाह्य प्रकारे वीज जोडणी घेतली गेली असेल तर कारवाई करावी . दुसरीकडे पालिकेचा एक विभाग असणाऱ्या पाणीपुरवठा विभागाने सर्रास चालू असलेली अवैध नळ जोडणी व इमारत बांधताना वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर अंकुश आणला तर भूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम अतिक्रमण करणाऱ्यांना आळा बसणार नाही का ? असा मतप्रवाह सामान्य नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे .

 ज्यांच्या ज्यांच्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमण वर कारवाई करण्यात आली आहे त्यांना त्यांच्या अज्ञानामुळे की कोणाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम पत्रा शेड उभारले होते याचे ही आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह

अनवर अली शेख ( सह संपादक ) 

Post a Comment

Previous Post Next Post