जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21 सिंधुदुर्ग जिल्ह्याला 'ॲवार्ड ऑफ एक्सलन्स'

दिल्ली येथील सोहळ्यात मुख्य सचिवांच्या हस्ते जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना प्रदान


प्रेस मीडिया लाईव्ह :

सिंधुदुर्गनगरी, दि. ९ (जि.मा.का.) : कौशल्य विकास व उद्यमशिलता मंत्रालयाद्वारे आयोजित जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21 साठीचा ॲवार्ड ऑफ एक्सलन्स जिल्ह्याला प्राप्त झाला. नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र मधील नालंदा सभागृहात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज प्रदान करण्यात आला.

            जिल्हा कौशल्य विकास आराखडा सन २०२०-२१ कौशल्य विकास मंत्रालय,  अंतर्गत  एकूण 3 वर्गवारीत त देशातील एकूण ४६७ जिल्ह्यांच्या सहभाग होता. ॲवार्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कारासाठी अंतिम फेरीत एकूण 30 जिल्हे होते. त्यापैकी एकूण 8 जिल्ह्याची निवड झाली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.

            जिल्ह्याची सामाजिक व आर्थिक रचना समजून घेऊन, येथील तरुणांना अनुकुल अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ते कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने या आराखड्याची निर्मिती करण्यात आली. यात कृषी, जैवीक कृषी, फळबाग संवर्धन, पर्यटन, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, समुद्र पर्यटन आदी जिल्ह्याची ओळख मानल्या जाणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाची असलेली मागणी डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आले. शाश्वत विकासाच्या दृष्टीने अशा आराखड्यांची निर्मिती अतिशय महत्वाची आहे, असा उल्लेख पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आला.  

            कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सहसचिव अनुराधा वेमुरी उपस्थित होत्या.



Post a Comment

Previous Post Next Post