माणगाव येथून आठ जिवंत बॉम्ब हस्तगत; पोलिसांची जोरदार कारवाई

करंजवाडी आदिवासी वाडीवर गावठी बॉम्ब असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे साडेचार वाजता धाड टाकून आठ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत केले.


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 अलिबाग : रायगड जिल्ह्यातील  माणगाव तालुक्‍यात पाणसई येथे पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत आठ जिवंत बॉम्‍ब (Bomb) हस्‍तगत केले आहेत. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास करंजवाडी या आदिवासीवाडीवर बॉम्‍बशोधक आणि नाशकपथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ब्रुनो  नावाच्‍या श्‍वानाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

करंजवाडी आदिवासीवाडीवर गावठी बॉम्‍ब असल्‍याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार पहाटे साडेचार वाजता धाड टाकून आठ जिवंत गावठी बॉम्‍ब हस्‍तगत केले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत म्‍हात्रे, सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. भोईर, हेडकॉन्‍स्‍टेबल भूपेंद्र देसाई, संतोष राऊत, राहुल पाटील, शैलेश गोतावडे, जितेंद्र सातोडे यांनी या कारवाईत भाग घेतला.

डुक्‍कर  किंवा तत्‍सम जंगली प्राण्‍यांची शिकार करण्‍यासाठी हे बॉम्‍ब तयार करण्‍यात आले होते, अशी प्राथमिक माहिती हाती लागली आहे. हे आदिवासी स्‍वतःच असे बॉम्‍ब तयार करत असल्‍याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात माणगावमध्येच बॉम्ब फूटून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Post a Comment

Previous Post Next Post