पैशाच्या बळावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जनता जनार्दन स्वीकारणार काय..?

 गोरगरीब जनतेचा,नगरसेवक कर्तुत्वाचा नगरसेवक

नगरसेवक निवडताना जनतेच्या हिताचा ठरेल असा आदर्श नगरसेवक निवडला पाहिजे अशी जनजागृती केली पाहिजे.

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख :

पुणे,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध सामाजिक उपक्रमाअंतरगत नागरिकांना मताधिकार बजावण्या करीता जनजागृती केली जाते परंतु लोक प्रतिनिधी ,नगरसेवक निवडताना जनतेच्या हिताचा ठरेल असा आदर्श नगरसेवक निवडला पाहिजे अशी ही जनजागृती केली पाहिजे.

 नगरसेवक म्हणून निवडणुका लढविणारे आणि जिकणारे तर बरेच असतात, पण खऱ्या अर्थानं जनंतेची मने जिंकणारा एखादाच असतो , तो म्हणजे गोरगरीब जनतेचा , नगरसेवक, कर्तुत्वाचा  नगरसेवक, कार्यक्रत्यांचा नगरसेवक, आपुलकीचा नगर सेवक, प्रभागातील प्रत्येक घराला आपला वाटणारा नगर सेवक,

सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानणारा समाजरत्न , राजकीय, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात चमकणारा तारा ,राजकारणात समाजाचा गैर वापर न करणारा कर्तुत्ववान नगरसेवक म्हणून निवड करण्याची जबाबदारी ही नागरिकांचीच आहे,

महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी विविध कायद्यांखाली कोणकोणत्या स्वरुपाच्या अपात्रता नमूद करण्यात आल्या आहेत ? त्याची माहिती लोकांमध्ये जाऊन जनजागृती करणे आज सजग नागरिक म्हणून काळाची अति महत्वाची गरज आहे.

 महाराष्ट्र महानगरपालिका  अधिनियमाच्या कलम १० मध्ये..

*महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी खालील स्वरुपाच्या अपात्रता नमूद करण्यात आल्या आहेत;*

 १. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५ व्या प्रारंभानंतर कोणत्याही वेळी भारतीय दंड संहितेचे कलम १५३ - अ किंवा कलम ५०५ अन्वये शिक्षापात्र अपराध सिध्द झालेली व्यक्ती सदर तारखेपासून सहा वर्षाच्या मुदतीपर्यंत निवडून येण्यास अपात्र आहे .

 २ . राज्य विधान मंडळाच्या निवडणुकीच्या प्रयोजनार्थ त्या - त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याव्दारे अपात्र ठरलेली व्यक्ती . 

३. महाराष्ट्र राज्य विधान मंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरविण्यात आलेली व्यक्ती .

 ४. नैतिक अध : पाताचा अंतर्भूत अपराधाबद्दल भारतातील न्यायालयाने दोषी / सिध्दापराधी ठरविले असेल तर आदेशाच्या दिनांकापासून सहा वर्षाचा कालावधीपर्यंत . 

५. अमुक्त नादार असलेली व्यक्ती .

६ . महापालिकेच्या अधिकाराखालील कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करीत असेल ती व्यक्ती . 

७.महापालिकेकडून लायसन्स दिलेला सर्वेक्षक वास्तूशास्त्रज्ञ , अभियंता संरचना संकल्पचित्रकार , बांधकाम लिपीक , नळ कारागीर किंवा तत्सम लायसन्स दिलेली व्यक्ती किंवा अशी कोणतीही लायसन्स दिलेली व्यक्ती जिची सदस्य असेल त्या व्यवसाय संस्थेची सदस्य असलेली व्यक्ती .

 ८ . शहराच्या सीमामध्ये अधिकारिता असलेले कोणतेही न्यायिक पद धारण करत असलेली व्यक्ती . 

९ . महानगरपालिकेबरोबर कोणत्याही करारात किंवा नोकरीत भागीदार असलेली व्यक्ती किंवा तिच्या भागीदाराचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग किंवा हितसंबंध असलेली व्यक्ती . 

१०. महानगरपालिकेच्या थकबाकीदार म्हणून खास नोटीस बजावल्यानंतर तीन महिन्याच्या आत ती भरण्यास कसूर केलेली व्यक्ती . 

११. अधिनियमाच्या तरतुदीनुसार निश्चित केलेल्या दिनांकास दोन पेक्षा अधिक अपत्य असलेली व्यक्ती . 

१२. निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने राज्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरविलेली व्यक्ती . 

१३. दोन पेक्षा अधिक अपत्य असणारी व्यक्ती . 

( संदर्भ - महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १० )


क्रमश; भाग ३


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक : अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post