आझम कॅम्पस च्या शाळांचे १२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज ,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल, एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत यश मिळवले. 

 अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज च्या विज्ञान शाखेचा निकाल ९९.५० टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ९९ टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल ८४ टक्के इतका लागला

 विज्ञान शाखेतून ८४ टक्के गुण मिळवून पटेल अफसा महमद खालिद प्रथम आली . कला विभागात ८८ टक्के गुण मिळवून रती पर्वतकर प्रथम आली तर कॉमर्स विभागात मुकादम उमेमा सलीम यांना ९२ टक्के गुण मिळाले आणि प्रथम आली . एम सी व्ही सी मधे अन्नूसिंग बिहारिलाल ८२ टक्के गुण मिळवून प्रथम आली . अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य  गफार  सय्यद,उपप्राचार्य तस्नीम शेरकर ,हनीफ शेख यांनी अभिनंदन केले. 

 अँग्लो उर्दू बॉईज् स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चा एकूण निकाल ९९.३८ टक्के लागला. विज्ञान शाखेचानिकाल ९९.५५ टक्के, वाणिज्य शाखेचा ९९.५६ टक्के तर कला शाखेचा ९७.२९ टक्के निकाल लागला. मुख्याध्यापक परवीन शेख यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. अथर्व  खोत ९५. १७ टक्के गुण मिळवून विज्ञान  शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात आलिद  शेख ७९. १७ टक्के मिळवून प्रथम आला तर खाशमान  शेख ८१.१७ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आला.

एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल ९९.०९ टक्के लागला.विज्ञान शाखेचा निकाल ९८.९० टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ९५ टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के इतका लागला. फुरकान खान ८१.८३ टक्के गुण मिळवून विज्ञान  शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात मुस्तकीम राठोड ८६ टक्के मिळवून प्रथम आला तर ९०.१६ टक्के गुण मिळवून तानझीला शेख कला शाखेत प्रथम आली.मुख्याध्यापक शिरीन शेख  यांनी अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार ,उपाध्यक्ष अबेदा इनामदार ,सचिव प्रा. इरफान शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .




                           

Post a Comment

Previous Post Next Post