विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप : शिक्षणासाठी पर्याय रेडिओचा....

विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप : शिक्षणासाठी पर्याय रेडिओचा..



प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ तुषार निकाळजे :

पुणे : गेल्या आठवड्यात मुलाच्या शाळेचे व मुलीच्या महाविद्यालयाचं लेक्चर मोबाईलच्या झुम अँपवर  चालू होते.  ते पहिलं लेक्चर होत.  तसं प्रत्यक्ष अभ्यासक्रमाबद्दल फार चर्चा नव्हती.  त्यामुळे पालकांनाही समाविष्ट केलं होत.  विद्यार्थी,  शाळा व कॉलेज यांच्यातील समन्वयाची माहिती पालकांना असावी हा त्यामागचा  उद्देश.  मी मुलीसमवेत एका मोबाईलवर या झूम अॅप वर होतो,  तर दुसऱ्या मोबाईलवर मुलगा व पत्नी होत्या.  सुरुवातीच्या दहा मिनिटांत महाविद्यालयातील झूम ॲप कनेक्ट झाला नाही.  कारण तो डिवाइस बंद पडला होता.  त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त माहिती झाली असावी.  नंतर पंधरा मिनिटात दुसरी लिंक पाठवण्यात आली  व तो झूम ॲप चालू झाला.  तरीदेखील मध्ये मध्ये तो बंद पडून पुन्हा चालू होत होता.  मुलांच्या मोबाईलच्या झुम चर्चेचा आवाज येत नव्हता, असे बरेच वेगवेगळे  प्रकार घडले.  पण पर्याय नव्हता.  आता लाँक डाऊन,  सोशल डिस्टंसिंग, तांत्रिक  जागतिकीकरणामुळे हे सहन करणे गरजेचे होते. आता जग  तांत्रिकी करण्याच्या विळख्यात  सापडले आहे . त्याला तांत्रिक अडचणी कशा अपवाद असतील.  इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाने वर्ष २०१५ मध्ये ई- लर्निंग योजनेअंतर्गत रुपये २२५०  कोटीचे टॅब वाटप करावे  असे जाहीर केले होते.  प्रत्येक वर्षी रुपये २५०  कोटी खर्च करण्याचे प्रयोजन होते. या प्रत्येक टॅब ची किंमत रुपये ३०००  होती.  वह्या, पुस्तके,  दप्तराचे ओझे कमी व्हावे हा यामागचा उद्देश. तसेच दिल्ली राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे शैक्षणिक टँब वापराची चर्चा सुरू केली होती.  परंतु हे सर्व साहित्य वापरासाठी राऊटर,  इंटरनेट , वाय-फाय रिचार्ज याचा वेगळा खर्च आणि पुन्हा तांत्रिक व्यत्यय  आलाच. भारतातील किमान २८% जनतेकडे स्मार्टफोन नाही. २६ टक्के जनता साक्षरच नाही. मग हे टॅब किती जणांच्या उपयोगाचे,? शिक्षण हक्क विधेयक तर संमत झाले,  पण आता वेळ आली आहे हे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची. परंतु पर्याय म्हणून रेडिओ स्टेशनचा वापर करणे शक्य आहे. खर्च कमी,  विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत शैक्षणिक माहिती पोहोचविणे व त्या अनुषंगाने धोरण निश्चिती होणे आवश्यक वाटते.

                   मी पन्नाशी ओलांडलेला असल्याने या गोष्टी मला नवीन नाहीत.  पण मला माझ्या बालपणीच्या आठवणी दिसू लागल्या.   त्यावेळी रेडिओ हा जीव की प्राण असायचा. घरामध्ये,  बांधकामाच्या , ठिकाणी शेतामध्ये,  सायकलवर रेडिओ ऐकण्याची सवय होती. त्यावेळी दोन बँड, चार बँड,  वॉल असलेला देशी विदेशी स्टेशन असलेला रेडिओ असायचा.  रेडिओ ऐकण्याची मज्जाच काही वेगळी  होती.  या रेडिओच्या माध्यमातून विरंगुळा, करमणूक,  शैक्षणिक माहिती,  जगातील घडामोडींची माहिती व्हायची. रेडिओचा शोध १८८४ च्या दरम्यान लागला. भारतामध्ये त्याचे आगमन १९२३  मध्ये झाले. पूर्वी रेडिओ हा लाकडी  संच होता. तर नंतर प्लास्टिक संचात रेडिओ उपलब्ध झाला. सुरुवातीस इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचे नियंत्रण रेडिओ प्रसारणावर होते.  नंतर त्याचे रूपांतर ऑल इंडिया रेडिओ मध्ये झाले.  कालांतराने ट्रांजिस्टरनामक छोट्या रेडिओचा जन्म झाला. गाणी, नाटके, एकपात्री प्रयोग,  चर्चा, बातम्या इत्यादीं बरोबरच शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण व्हायचे.  आठवड्यातील प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आदल्या दिवशी किंवा आठवड्याच्या सुरुवातीस सांगायचे . शालेय पुस्तकातील प्रकरणे,  कविता ज्या दिवशी प्रसारित होणार असतील त्यादिवशी विद्यार्थी रेडिओ समोर पुस्तकातील धडा किंवा कवितेचे पृष्ठ उघडून बसायचे. कार्यक्रम सुरू झाला कि वहीमध्ये त्याचे टिपण करायचा . त्यावेळी त्याची स्वतःची आकलनशक्ती दांडगी असायची. आता टीव्ही, मोबाइल,  कॉम्प्युटर,  सचित्र प्रात्यक्षिकाद्वारे होत असल्याने विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात अवलंबून राहू लागले. याला काही अपवाद आहेत.  भारतातील रेडिओचे नियंत्रण माहिती व प्रसार विभाग, नवी दिल्ली यांचेकडे आहे. संगणक इंटरनेट येण्यापूर्वी या संस्थेकडे अर्ज करून त्याचे शुल्क पोस्टाद्वारे भरले जात किंवा क्वचित  प्रसंगी एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात तेथे पाठवून नोंदणी करण्याचे काम केले जात होते.  सध्या नवीन रेडिओ चॅनेल सुरु करावयाचे असल्यास ऑनलाइन नोंदणी व शुल्क भरण्याची सोय आहे.  सध्या रेडिओ  स्टेशन बरोबरच विद्यावाणी, कम्युनिटी रेडिओ,  इंटरनेट व्हिडीओ ही संकल्पना अस्तित्वात आली.  काही विभागांमध्ये खाजगी प्रसारण संस्था देखील तयार झाल्या.  काही शैक्षणिक संस्थांमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून e-content सारखे स्टुडिओ देखील तयार झाले. परंतु प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची संख्या अतिशय अल्पच राहिली.  सध्या ऑनलाइन झूम इंटरनेट द्वारे शिक्षण दिले जात आहे . परंतु त्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी येत आहेत.  विद्यार्थी मोबाईल घेऊन बसला की तो कनेक्शन,  नाँट कंनेक्टींग, लोडींग असे मेसेजेस येऊन कार्यक्रमात व्यत्यय  येत असतो. काही वेळा काही विद्यार्थी मोबाईल मध्ये एका बाजूस लेक्चर व त्यामध्ये दुसऱ्या बाजूस गेम खेळण्यात व्यस्त दिसतात.  मोबाईल,  संगणक, इंटरनेट यावर बॅक एंडला जाऊन पुन्हा प्रसारण करता येते. त्यामुळेही काही मंडळी बिनधास्त असतात.  त्याऐवजी रेडिओ  असेल तर पेन,  पेन्सिल,  वही द्वारे टिपण करणे भाग पडते. ही एक वेगळी शिस्त. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यासाठी रेडिओ स्टेशनची परवानगी घ्यावी लागते.  संगणक, मोबाईल, इंटरनेट सारखे बॅग एंडला जाऊन पुन्हा कार्यक्रम बघता येत नाहीत . सध्याच्या लॉक डाऊन,  सोशल डिस्टंसिंगच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायासाठी काही अंशी रेडिओचा वापर करता येणे शक्य आहे.  एखाद्या शिक्षण संस्थेने स्वतःचे रेडिओ स्टेशन चालू करून प्रत्येक विद्यार्थ्यास दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत एका रेडिओचे किट उपलब्ध करून दिल्यास किमान त्या त्या शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना कविता , धडे, अभ्यासक्रम यासारखी तोंडी  माहिती देणारे विषय शिकविणे शक्य होईल.  रोज किमान तीन चार विषयांचे श्रवण झाल्यास विद्यार्थी प्रत्यक्ष पुस्तकाद्वारे अभ्यासक्रमाचे अवलोकन करू शकेल. त्याचबरोबर मोबाईल, संगणक,  इंटरनेट व इतर पूरक साधनांचा वापर करण्यास हरकत नाही.  परंतु काही अंशी रेडिओचा हा पर्याय प्रात्यक्षिक स्वरूपात वापरून पाहण्यास काय हरकत आहे ? किमान दुर्गम भागातील, गरीब व दारिद्र्य रेषेखालील २८ टक्के जनतेचा विचार व्हावा असे वाटते.

प्रेस मीडिया लाईव्ह मध्ये , 

छोट्या जाहिराती साठी संपर्क : 

५००/रू. दहा दिवस जाहिरात.


Post a Comment

Previous Post Next Post