पुण्यातील पालखी मार्गक्रमावर आम आदमी पक्षाकडून वारकऱ्यांची सेवा



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कोरोना काळातील प्रतिबंधानंतर प्रथमच होत असलेल्या वारी सोहळ्यात वारकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अत्यंत उत्साहात पुणे शहरातून पालखीचे मार्गक्रमण संपन्न झाले. 

यावेळी शहरातील विविध भागात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भाविकांची सेवा केली. शहरातील गणेश पेठ येथे आप कार्यकर्ते किरण कद्रे, हाजी ईकबाल तांबोळी, शहर संघटक एकनाथ ढोले, योगिता तावरे - बलकवडे, सरफराज शेख, नरेंद्र देसाई यांच्याकडून भाविकांसाठी जवळपास १०००० मास्क तसेच खाऊ, फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आप राज्य प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे, गणेश थरकडे, आनंद अंकुश, किरण कांबळे यांच्या उपस्थितीत हा वाटप कार्यक्रम करण्यात आला.

 शिवाजी नगर येथे वैशाली डोंगरे, शंकर थोरात यांनी नरवीर तानाजी वाडी येथे वारकऱ्यांचे स्वागत करत फराळ वाटप केले.

नाना पेठ येथील पालखी विठोबा चौकात पालखी सोहळ्या दरम्यान दोन दिवस आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छतेचा संदेश देत वेगळ्या प्रकारे भाविकांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आप कार्यकर्ते किरण कांबळे, विद्यानंद नायक, अजय पैठणकर, फॅबियन अण्णा सॅमसन, निरंजन अडगळे, सर्फराज मोमीन, माधुरी गायकवाड़, हर्षल साळुंखे, उन्मेष बागड़े, नरेंद्र देसाई,नीलेश वांजळे, गणेश शेंडगे, आनंद अंकुश, सुहास पवार, जयश्री दींबळे, आर्चबिशप सिन्हा, दिनेश कांबळे, सुनील वालेकर  यांनी सफाई मोहिमेत सहभाग घेतला.

अनिल कोंढाळकर यांनी सदाशिव पेठ येथे आम आदमी पक्षातर्फे २०० वारकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तर कर्वेनगर येथे प्रा सुहास पवार, रोहन रोकडे, सुशील बोबडे, निलेश वांजळे, आरती करंजावणे, ज्योती ताकवले  यांनी वारकऱ्यांसाठी तंबू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. तसेच टिंबर मार्केट येथे शेखर ढगे यांनी शेकडो वारकऱ्यांसाठी नाश्ता वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.

फुरसुंगी येथे आप कार्यकर्ते अशोक हरपळे, सचिन कोतवाल आणि अस्मिता ताई मांढरे यांच्या वतीने वारकरी भाविकांना फराळाचे तसेच पाणी वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवासी देखील सेवा कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पालखीचे दिवे घाटातून प्रस्थान झाल्यावर सासवड जवळ आप कार्यकर्ते किरण इंगळे यांच्या वतीने वारकरी भाविकांना २५०० पिण्याच्या पाणी बोटलचे वाटप करण्यात आले. यावेळी आप कार्यकर्ते किरण इंगळे, रोहन रोकड़े, सुहास पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

वारकरी चळवळीचा प्रबोधनाचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम आदमी पक्ष कटिबद्ध असून नागरिकांची मनोभावे सेवा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post