पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत अतिक्रमण हटाव पथकाची धडक कारवाई

पुन्हा महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे . प्रेस मीडिया लाईव्ह 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :  एम.एस .पठाण 

पिंपरी चिचवड महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे . अनधिकृत बांधकामे , पत्राशेड , टप - या काढण्यात येत आहेत . शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज कारवाई सुरु आहे . आज भूमकर चौक परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि पत्रा शेड वर अतिक्रमण विरोधी पथक ची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.

 शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेच . शहरात 2012 मध्ये 66 हजार अनधिकृत बांधकामे असल्याची नोंद  पिंपरी चिंचवड महापालिकेकडे होती . सध्याच्या परिस्थितीत शहरातील अनधिकृत बांधकामांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे . शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे होताना दिसत आहेत . अनधिकृत बांधकामांची वाढ सुरुच आहे . कोरोनाच्या पावणेदोन वर्षाच्या कालावधीत अनधिकृत बांधकामावरील कारवाई थंडावली होती . पुन्हा महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे .

शहराच्या विविध भागांतील अतिक्रमणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी मोठा फौजफाटा घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहेत. मर्यादेपेक्षा अधिक, अनधिकृत बांधकामे दुकानदारांकडून केली जातात. तसेच घरांच्या बाबतही आढळून आले आहे. त्यांच्यावर आता हातोडा पडत आहे. बेकायदा बांधकामांची गय केली जाणार नाही, असा संदेशच यानिमित्ताने महापालिकेकडून देण्यात आला आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post