नागराळे गावच्या ग्राम विकास वाचनालयाचे नुतनीकरण उद्घाटन.मा.श्री.अरूणजी लाड.आमदार यांचे हस्ते संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

नागराळे गावच्या ग्रामविकास वाचनालयाचे भव्यदिव्य उद्घाटन.मा.   आमदार श्री.अरूणजी लाड.आमदार यांचे हस्ते सोहळा संपन्न झाला. त्याच प्रमाणे नागराळे गावातील विविध विकास कामांचा समावेश असून ७०.००००० लाखावून अधिक कामे मा.अरूणजी लाड यांच्या आमदार फंडातून पुर्ण केली आहे . त्याचबरोबर आज शुक्रवार दिनांक .३ / ६ / २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता नागराळे गावात ग्राम विकास वाचनालयाचे उद्घाटन आदरणीय श्री अरूणजी लाड . , आमदार . ( पुणे विभागीय पदवीधर शिक्षक आमदार . ) आणि क्रांती पाक्षिकाचे संपादक आणि पुरोगामी विचारांचे मार्गदर्शक श्री . वि.वाय . आबा पाटील व श्री सुनील हिंदूराव जाधव . सातारा जिल्हा संपर्कप्रमुख . छत्रपती राजर्षी शाहू महाराज.कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य . त्याच बरोबर श्री . पाटील.सर . नागराळे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ वनिता पाटील त्यांचे सर्व सहकारी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

या उद्घाटनप्रसंगी कला व क्रीडा शिक्षक यांच्या विविध अडचणी कशा प्रकारे निर्माण झाल्या आहेत त्याबद्दल नवीन शैक्षणिक धोरणानुसार संचमान्यतेमध्ये कला व क्रीडा शिक्षक यांचे पदास दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे.कला शिक्षक यांना पदवीधर वेतनश्रेणी असेल . त्याच बरोबर सेवा ज्येष्ठता यादी मध्ये तफावत आहे.

 त्याचप्रमाणे कला शिक्षक यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार   प्रमोशन देणे गरजेचे आहे तसे दिले जात नाही.कला शिक्षकांना शासन नियमानुसार दिनांक ३० जुलै १९८० जी.आर नुसार देता येते पण दिले जात नाही.त्याच बरोबर कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी  ए.टी.डी.टू ए.एम पदवीधर वेतनश्रेणी विनाअट मान्यता देण्यात यावी.तरी सुध्दा अनेक अडचणी दाखविल्या जातात.अशा अनेक विषयांवर मनमोकळेपणाने सखोलपणे संवादातून चर्चा करण्यात आली आहे.या सर्व अडचणी सोडविण्यासाठी त्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने  मा.अरूणजी लाड.साहेब पुणे विभागीय पदवीधर शिक्षक आमदार.यांना जाहीर निवेदन दिले.त्यांनी ते दिलेले निवेदन विचार पुर्वक वाचून आम्हास आश्वासन दिले आहे. की आपल्या सर्व कला व क्रीडा विषय lशिक्षकांच्या संचमान्यतेमध्ये असलेल्या अडचणी दुरूस्ती करून पुर्वी प्रमाणे संचमान्यतेमध्ये स्पेशल टिचर पद दाखविण्यासाठी मी आपणास आश्वासन देतो आहे.

Post a Comment

Previous Post Next Post