महाविकास आघाडीतून बाहेरही पडण्याची आमची तयारी आहे... संजय राऊत.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे       महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांना दिलेली नवी ऑफर ही महाविकास आघाडीसाठी तणाव वाढवणारी ठरली आहे. शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेरही पडण्याची आमची तयारी आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. आतापर्यंत केवळ उद्धव ठाकरेच नाही, तर शरद पवार आणि काँग्रेस पक्षही महाविकास आघाडी सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अशा स्थितीत आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे म्हणत राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.


फक्त आमदारांनी पुढील 24 तासांत मुंबईत यावं आणि इथे येऊन चर्चा करावी, असं राऊत म्हणाले. यानंतर काँग्रेसने आपली भूमिका ठरविण्यासाठी सह्याद्रीवर बैठक बोलावली आहे. राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे वाय. बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post