विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता

 राज्याच्या राजकारणात एकच खळबळ

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई: विधान परिषद निवडणूक  निकालानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या  स्थैर्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  एकनाथ शिंदे आधी नॉट रिचेबल होते. आता ते सूरत मधील ली मेरिडिअन  हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 11 आमदार असल्याचीही चर्चा आहे. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. तिथे भाजपाचं सरकार आहे. आता एकनाथ शिंदे तिथे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 

दोन पक्षांची मतं फुटली

काल विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपाचे सर्वचच्या सर्व पाच उमदेवार निवडून आले. शिवसेनेचही दोन उमदेवार निवडून आले. पण त्यांची 12 मत फुटली. त्याचवेळी काँग्रेसची सुद्धा 6 मत फुटली. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झालय. काल विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर आमदार आपआपल्या मतदारसंघात जातो, सांगून निघाले, पण शिंदे थेट गुजरातमध्ये असल्याची आज सकाळी बातमी आली.

आपल्या पक्षात फाटाफूट नको, म्हणून….

त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिंदेंसोबत 11 आमदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटातही चिंता निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या पक्षात फाटाफूट नको, म्हणून आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तिथे काय स्थिती आहे, ते चित्रही लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची दाट शक्यता आहे.


भाजपाचे विजयी उमेदवार

प्रवीण दरेकर - 29 मते
श्रीकांत भारतीय - 30 मते
राम शिंदे - 30 मते
उमा खापरे - 27 मते
प्रसाद लाड - 28 मते


विधान परिषद निवडणूक निकाल : मतांचं गणित

– शिवसेना :
शिवसेनेचे एकूण आमदार – 55
सहयोगी छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून – 64
पडलेली मतं – 52
शिवसेनेची किती मतं फुटली – 12

– काँग्रेस :

काँग्रेसचे एकूण आमदार – 44

काँग्रेससोबत अपक्ष आमदार – 4

काँग्रेसकडे एकूण मतं – 48

काँग्रेसला फडलेली मतं – 42

काँग्रेसची किती मतं फुटली – 6

– भाजप :

भाजपचे एकूण आमदार – 106

भाजपसोबत एकूण अपक्ष आमदार – 7

भाजपकडे एकूण मतं – 113

भाजपला पडलेली मतं – 134 (एक मत बाद)

भाजपला संख्याबळापेक्षा 21 मतं अधिक मिळाली

– राष्ट्रवादी काँग्रेस :

राष्ट्रवादीचे एकूण आमदार – 51
(दोन आमदार तुरुंगात असल्याने मतदान करता आले नाही)

राष्ट्रवादीला मिळालेली मतं – 57

राष्ट्रवादीला संख्याबळापेक्षा 6 मतं अधिक मिळाली

Post a Comment

Previous Post Next Post