कोल्हापूर : वादळी वाऱ्यासह पावसाने शहर व परिसराला चांगलेच झोडपून काढले.

इचलकरंजी शहरा मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार दणका दिला .


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : आज सायंकाळ नंतर  वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे हवेत चांगलाच गारवा पसरला.  केवळ अर्धा तासच झालेल्या या पावसामुळे मात्र सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात असह्य उकाडा होता. आज दुपार नंतर अचानक वातावरणात गर्मी वाढत गेली आणि सायंकाळी 4 नंतर आकाशात ढगांनी घर करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने  शहर व परिसराला चांगलेच झोडपून काढले.


दरम्यान महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी शहरा मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार दणका दिला .

येणाऱ्या तीन ते चार तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र, वादळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात असेही सांगण्यात आले होते. तसेच या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळावा आणि अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं. असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आलं होतं. 

Post a Comment

Previous Post Next Post