हज यात्रेकरुंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण शिबीरप्रेस मीडिया लाईव्ह :

जालना :  (जिमाका) :-  हज कमिटी जालना व सामान्य रुग्णालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हज यात्रेकरुंसाठी सामान्य रुग्णालय  येथे लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले.  एकुण 140 यात्रेकरुंपैकी आज 45 यात्रेकरुंनी लस घेतली असुन उर्वरीत यात्रेकरुंनी दि. 11 जुन 2022 रोजी लस घ्यावी,  असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले . 

    जिल्हा शल्य चिकित्सक हज यात्रेकरुंना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, कोविड 19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे कमी झाला नसल्याने हज यात्रे दरम्यान आरोग्याची काळजी म्हणुन मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर ठेवणे याचे पालन करा तसेच आपल्या आरोग्घ्या काळजी घ्यावी

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राजेंद्र गायके, डॉ. उमेश वैष्णव, वैद्यकीय अधिकारी, डॉ. फिरोज, डॉ. लतिफ,औषध निर्माण अधिकारी, संजय पवार, शहानवाज अहेमद, तौफीक पठाण, वसीम शेख सांख्यिकी सहाय्यक,  ताहेर कुरेशी तसेच श्रीमती आर.डी. वसु व खादीमिनेहुजाज हज कमिटी यांनी परिश्रम घेतले


Post a Comment

Previous Post Next Post