स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तब्बल २७ वर्षानंतर भेटले वर्ग मित्र-मैत्रिण

 राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात..


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या १९९४-१९९५ बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. तब्बल २७ वर्षानंतर भेटलेल्या वर्ग मित्र-मैत्रिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी आठवणींची शिदोरी घेऊन पुन्हा पुढील वर्षी नव्याने भेटण्याचे आश्वासन एकमेकांना देण्यात आले.

इयत्ता दहावी म्हणजे शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा समजला जातो. या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. राजर्षी शाहू हायस्कूलमधील १९९५ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांना हा टप्पा ओलांडून २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. दहावीची परीक्षा दिल्यानंतर बहुतांशी मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी शैक्षणिक मार्ग शोधत पुढे गेले. करिअरच्या मागे धावत असताना मित्रांना भेटणे तर दूरच पण बोलणेही नव्हते. मात्र, व्हॉट्सअँप सारख्या सोशल साईटमुळे आणि हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त झालेल्या स्नेहमेळाव्यानिमित्त अनेक जुन्या मित्रांची भेट झाली. यातूनच मित्र-मैत्रिणींचा शोध सुरू झाला. याला बहुतांशी यशही मिळाले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस प्रकाश निकम, इराण्णा सिंहासने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक पी. डी. हुपरीकर उपस्थित होते. तब्बल २७ वर्षानंतर स्नेहमेळाव्याचे आयोजन येथील यशोदीप कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी सुमारे ८० हुन अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मित्र-मैत्रीणींनी २७ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा दिला. आता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, भविष्यात पुन्हा सर्वांनी एकत्र यावे, असा मानस व्यक्त करून सर्वांनी आपला परिचय करून दिला. यावेळी मनसोक्त गप्पा मारल्या. स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच माजी विद्यार्थी चेतन कांबळे, राजू दोडमणी, प्रकाश कुंभार, हरीश कांबळे, सुनिल पाटील, सुनिल मानू यांच्यासह अनेकांनी गाणी गायली. यानंतर फनी गेम्स व संगीत खुर्ची खेळात सर्वजण दंग झाले होते. सर्वांनी आनंद लुटत पुढील वर्षी पुन्हा एकत्र येण्याचे नक्की केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रकांत जिंदे, धोंडीलाल कलावंत, दत्तात्रय काटकर, उत्तम कोटगी ,

अनंत भुते, रावसाहेब कांबळे, दिनेश टिंगरे, ईश्वर कराडकर, कैलास म्हेतर, संजय कांबळे, नंदकुमार खोत, गणेश बलुळगिड, किरण शेरखाने, प्रकाश धामणे, बसवराज हुक्केरी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post