इचलकरंजीत मनसेच्या वतीने उज्वला गॅस कनेक्शन , शालेय साहित्याचे वाटप



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील जवाहर नगर परिसरात मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस समाजातील गरीब व गरजूंना उज्वलागॅस योजना कनेक्शन व शालेय साहित्य वाटप करुन साजरा करण्यात आला.हा सामाजिक उपक्रम मनसे सहकार विभागाचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव ,मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर , रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम ,तिवारी गॅस एजन्सीचे राम तिवारी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

मनसे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली समाजातील अन्याय पिडीतांना न्याय मिळवून देतानाच गोरगरीबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.इचलकरंजी येथे जवाहरनगर परिसरात मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने 

आज मंगळवारी राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध  सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी भारत सरकारच्या उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप मनसे सहकार विभागाचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव यांच्या हस्ते तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुंडलिक जाधव ,मोहन मालवणकर ,रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्यासह विविध मान्यवरांनी मनसे पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतानाच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत असल्याचे सांगितले.तसेच यापुढील काळात देखील मनसे पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कार्यरत रहावे ,असे आवाहन केले.या सामाजिक उपक्रमास मनसे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुलोचना घाटगे ,सुरेखा शिंदे , राहुल दवडते , अब्दुल शिकलगार ,वैभव बोराडे , राहुल कडगांवे , महेश डांगरे , मधुकर पाटील , सुभाष इंगळे , अल्ताफ मुजावर ,कुबेर शिंदे यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते ,लाभार्थी , विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post